‘हिंमत असेल तर आमदार केसरकर यांनी कोकण आयुक्तांवर हक्कभंग आणावा’ | पुढारी

'हिंमत असेल तर आमदार केसरकर यांनी कोकण आयुक्तांवर हक्कभंग आणावा'

कुडाळ (सिंधुदुर्ग) : पुढारी वृत्तसेवा : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-चौकुळ येथील कबुलायदार प्रश्नी कोकण आयुक्त पाटील यांनी अलिकडेच स्थानिक आ. दिपक केसरकर यांच्या अनुपस्थितीत बैठक घेतली होती. त्यामुळे केसरकर यांनी आपल्याला बैठकीत डावलले असल्याबाबत खंत व्यक्त करत त्या कोकण आयुक्तांवर विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याचे जाहिर केले आहे. केसरकर यांच्या वक्त्यव्याचा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी समाचार घेत ‘ हिंमत असेल तर आमदार दिपक केसरकर यांनी कोकण आयुक्तांवर हक्कभंग आणावा’ असे ओपन चॅलेंज दिले आहे.

कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, भाजप युवा मोर्चाचे बंड्या सावंत, आनंद शिरवलकर, राकेश कांदे आदि उपस्थित होते.

यावेळी तेली म्हणाले की, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक केसरकर गेली १२ वर्ष आमदार म्हणून काम करत आहेत. त्यात ५ वर्ष ते मंत्री होते, मग मंत्री असताना आंबोली-चौकुळचा कबुलायदार प्रश्न त्यांना का सोडवता आला नाही? आता तो प्रश्न सुटावा यासाठी त्या ठिकाणचे ग्रामस्थ वारंवार मागणी करत आहेत. सावंतवाडी येथे तेथील ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले आहे. अशा परिस्थितीत कोकण आयुक्तांना आम्ही विनंती करत तुम्ही स्वतः ग्रामस्थांचे म्हणणे समजून घ्या. असे म्हटले.

संबंधित बातम्या

आमच्या विनंतीला मान देत कोकण आयुक्त पाटील आंबोली येथे आले. त्यांनी ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली आणि ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. म्हणून स्थानिक आ. केसरकर यांना पोटशुळ उठत असेल तर ते योग्य नाही. ग्रामस्थ आपल्या हक्कासाठी आयुक्तांसमोर बाजू मांडू शकतात. त्या बैठकीला स्थानिक आमदारांना बोलवायलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही, तरी सुध्दा आ. केसरकर आयुक्तांवर हक्कभंग करण्याची भाषा करतात हे योग्य नाही. हक्कभंग कधी आणतात हे आ. केसरकर यांना माहित आहे का? आयुक्त हे शिवसेनेचे अधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केली आहे.

तसेच तुम्ही हक्कभंग आणाच नाही तर राजिनामा देणार का ते सांगा? असे प्रश्न तेली यांनी उपस्थित केला. खरंतर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला नगरपंचायत या भाजपकडे आहेत. आता लोक विचार करत आहेत कि, कोण चांगल काम करतं, म्हणुनच सावंतवाडी मतदार संघातील जनता भाजपच्या मागे खंबीरपणे उभी असल्याची माहिती तेली यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button