PMC Election Problems: वाहतूक कोंडीला ब्रेक कधी? प्रभाग ७ मधील नागरिकांच्या समस्या ‘जैसे थे’

गोखलेनगर–वाकडेवाडी परिसरात पाणीपुरवठा, कचरा, ड्रेनेज आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न कायम; प्रशासनाकडे नागरिकांचा सवाल
PMC Election Problems
PMC Election ProblemsPudhari
Published on
Updated on

प्रभाग क्रमांक : 7 गोखलेनगर- वाकडेवाडी

प्रभागात (क्र. 7) उच्चभ्रू सोसायट्या आणि झोपडपट्टीचाही भाग आहे. या प्रभागात काही विकासकामे झाली असली, तरी विविध समस्या आजही कायम आहेत. वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, पार्किंग, कचरा आणि ड्रेनेज लाइनच्या समस्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गोखलेनगर, पाटील इस्टेट, मुळा रस्ता, वाकडेवाडी येथील झोपडपट्टी भागातील अद्यापही मूलभूत सुविधांची वानवा आहे. तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पही गेल्या काही वर्षांपासून रखडले आहेत.

PMC Election Problems
PMC Election: ‘फार घमेंडीत राहू नका… तुमचा खूपचंद होईल!’ — पुणे पालिकेतील न. चिं. केळकरांच्या गाजलेल्या निवडणूक गमतीजमती

या प्रभागात सकाळनगर, गोखलेनगर, वाकडेवाडी, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड, संगमवाडी आदी भागचा समावेश आहे. एकीकडे उच्चभ्रू सोसायट्यांची संख्या अधिक, तर दुसरीकडे झोपडपट्टीचाही भाग मोठा आहे. गेल्या काळात प्रभागातील विविध प्रश्न सोडविण्याकडे माजी नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषत: झोपडपट्टी भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गोखलेनगर, जनवाडी, पाटील इस्टेट, मुळा रस्ता येथील रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा, स्वच्छतागृहांचा अभाव, अस्वच्छता आणि कचऱ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

PMC Election Problems
PMC Election: प्रभाग २२; काँग्रेसचा गड टिकणार की भाजप पुन्हा सुरुंग लावणार? निवडणूक रंगणार रंगतदार

झोपडपट्‌‍ट्यांमधील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून ‌’जैसे थे‌’ आहे. वाकडेवाडी येथील भुयारी मार्गात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद आहे. तरीही या मार्गातून चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी असलेल्या एसटी स्थानकासमोर दररोज वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिक वैतागले आहेत. वाहनांच्या गर्दीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण होत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

PMC Election Problems
PMC Election: भवानी पेठ प्रभाग ‘जैसे थे’! अरुंद रस्ते, कोंडी, कचरा, अतिक्रमणांचा रोजचा त्रास कायम

सकाळनगर, वाकडेवाडी, सेनापती बापट रस्ता आदी भागात विविध विकासकामे झाली आहेत. परंतु रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. उच्चभ्रू सोसायट्या असलेल्या भागातील रस्ते आणि पदपथांचे सुशोभीकरण झाले आहे. परंतु झोपडपट्टीच्या भागातील परिस्थिती बिकट आहे. या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा आभाव आहेत. कचऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रहदारीस अडथळा होत आहे. आरोग्य केंद्रांचाही आभाव आहे. अपुऱ्या पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अतिक्रमणांचा प्रश्नही ‌’जैसे थे‌’ आहे. लहान मुलांसाठी क्रीडांगण आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची कमतरता आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

PMC Election Problems
PMC Election: विरोधकांचा डाव उलटवणारा शिवा मंत्री : एका झुंजार प्रवासाची कहाणी

प्रभागात या भागांचा समावेश

संगमवाडी, पाटील इस्टेट, वाकडेवाडी, मुळा रस्ता, खैरेवाडी, भोसलेनगर,

सकाळनगर, पंचवटी, गोखलेनगर, जनवाडी, निलज्योती सोसायटी, पत्रकारनगर, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड, बाणेर रस्ता, औंधचा काही भाग आदी.

PMC Election Problems
PMC Election: कोथरूड प्रभाग-31 : भाजपमध्ये तिकीटासाठी स्पर्धा; मोहोळांची खरी कसोटी

प्रभागातील प्रमुख समस्या

झोपडपट्टी भागामध्ये अद्यापही मूलभूत सुविधांचा अभाव

वाकडेवाडी एसटी बसस्थानकासमोर,

भुयारी मार्गात होणारी वाहतूक कोंडी

प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांची गैरसोय

मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी पदपथांचा अभाव

PMC Election Problems
PMC Election: कोथरूडमध्ये पुनर्विकास ठप्प, वाहतूक कोंडी वाढली; नागरिकांचा प्रशासनाला सवाल

प्रभागात झालेली विकासकामे

सेनापती बापट रस्त्यावर प्रशस्त पदपथ

ड्रेनेज लाइन आणि रस्त्याचे काँक्रिटीकरण

संगमवाडी येथील जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण

सुरक्षेसाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित

ई-लायबरी प्रकल्पासह ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालये.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी या उपाययोजना गरजेच्या

PMC Election Problems
Dr Baba Adhav: ‘एक गाव एक पाणवठा‌’चा बुलंद आवाज...' बाबा आढाव यांच्या परिवर्तनयात्रेची अज्ञात पावटणी

शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या कामासाठी वाकडेवाडी येथे स्थलांतरित केलेले एसटी बसस्थानक पुन्हा जुन्या जागी हलविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच भुयारी मार्गातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना होणे गरजेचे आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील मेट्रोचे काम पूर्ण करून येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्याची आवश्यकता आहे. सध्या या ठिकाणी एक लेन सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

PMC Election Problems
Dr Baba Adhav: जोतिरावांचे सच्चे अनुयायी...

प्रभागात ड्रेनेज व्यवस्थापन, पदपथांची निर्मिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालये आदी विकासकामे केली. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. वन उद्यान उभारण्यासाठीही प्रयत्न केले. ई-लायबरी प्रकल्प, रस्ते विकास आणि मैदानांचा विकास करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

आदित्य माळवे, माजी नगरसेवक

पीएमसी वसाहत, मुळा रस्ता आदी ठिकाणी समाजमंदिरांचे काम केले. महिलांना सक्षम बनविण्यासाठी त्यांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालये उभारली. लहान मुलांना खेळता यावे आणि ज्येष्ठ नागरिकांना फिरता येण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.

रेश्मा भोसले, माजी नगरसेविका

झोपडपट्टी भागात ड्रेनेज लाइनसह विविध विकासकामे केली. कचरा व्यवस्थापनासह जलवाहिन्यांच्या कामांनाही प्राधान्य दिले. अभ्यासिकांची उभारणी करण्यासह विविध प्रकल्प राबविले. नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी देखील काम केले.

राजश्री काळे, माजी नगरसेविका

PMC Election Problems
Dr Baba Adhav: समाजसेवेच्या पाऊलखुणा..

वाकडेवाडी येथे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. भुयारी मार्गातून चारचाकी वाहने आणि रिक्षांची ये-जा सुरू असल्याने दररोज सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक वैतागले आहोत. वाकडेवाडी एसटी स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

मयूर हरगणे, रहिवासी, वाकडेवाडी

गोखलेनगर भागात अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा आभाव आणि पार्किंगची समस्या आहे. या समस्या आताच्या नाहीत, तर गेल्या अनेक वर्षांपासूनच्या आहेत. गेल्या काळात या समस्या सोडविण्यासाठी माजी नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

शिल्पा डोंगरे, रहिवासी, गोखलेनगर

PMC Election Problems
Dr. Baba Adhav: अजित पवार ते केंद्रीय मंत्री मोहोळ—राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली

संगमवाडी येथील जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण केले. वाकडेवाडी पीएमसी वसाहतीत सुसज्ज इनडोअर कबड्डी हॉल आणि क्रीडांगणाचा विकास केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी दळवी हॉस्पिटलमध्ये मोफत फिजिओथेरपी सेंटर सुरू केले. पीएमसी वसाहतीचा पुनर्विकास, तसेच संगमवाडी ते महात्मा फुले मंडईदरम्यान केवळ 10 रुपयांत बससेवेसाठी पाठपुरावा केला. ड्रेनेज लाइनसाठी निधी उपलब्ध करून दिला.

सोनाली लांडगे, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news