

निनाद देशमुख
मयूर कॉलनी- कोथरूड हा प्रभाग (क्र. 31) भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपच्या खालोखाल या प्रभागात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची ताकद आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेास आणि शिवसेनेला (शिंदे गट) या प्रभागात उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत विरोधकांसमोर भाजपपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. मात्र भाजपच्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट वाटप करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कसोटी लागणार आहे.
प्रभागाची लोकसंख्या 83098 इतकी असून, यात अनुसूचित जाती 5337 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 662 नागरिकांचा समावेश आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मयूर कॉलनी- कोथरूड (क्र. 31) या प्रभागाची रचना भाजपला अनुकूल केली असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत या प्रभागातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह हर्षाली माथवड, वासंती जाधव हे निवडून आले होते. तसेच शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार हे देखील विजयी झाले होते.
या प्रभागात भाजपची ताकद मोठी असली, तरी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेचाही या भागात प्रभाव आहे. मागील लोकसभा निवडणुकीत या प्रभागातून भाजपला 14 हजार 851 इतक्या मतांची आघाडी मिळाली होती, तर विधानसभा निवडणुकीत 20 हजार 57 इतके मताधिक्य होते. त्यामुळे या प्रभागात गेल्या काही वर्षांत विरोधकांची ताकद कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
माजी नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव या पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र भाजप पुन्हा त्यांना संधी देणार का? हे पहावे लागणार आहे. तसेच मुरलीधर मोहोळ खासदार झाल्याने त्यांच्या जागेवर कोण निवडणूक लढणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले. ही जागा आपल्याकडेच ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असून, त्यासाठी कोथरूड मंडलाध्यक्ष ीिलेश कोंढाळकर आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. याशिवाय अनेक जण निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. भाजपत इच्छुकांची यादी मोठी असल्याने उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
महाविकास आघाडी होईल की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे घटक पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने (ठाकरे गट) प्रभागातील इच्छुकांची यादी मागवली आहे. मनसेकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. कॉंग््रेास, राष्ट्रवादी कॉंग््रेास (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) आणि शिवसेनेची (शिंदे गट) ताकद या प्रभागात कमी आहे. या पक्षांकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे.
शिवसेनेकडून (ठाकरे गट) माजी आमदार शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचे पुतणे योगेश मोकाटे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मनसेकडून देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी यादी असून, सुधीर धावडे, हेमंत संभूस, किशोर शिंदे, सुप्रिया काळे आदींची नावे आघाडीवर आहेत. कॉंग््रेासकडून किशोरी मारणे, तर राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून गिरीश गुरनानी यांचे नाव आघाडीवर आहे.
एकाला पक्षात घेण्याचा विचार
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या प्रभागात गतवेळेस भाजपला सर्वच्या सर्व चार जागा जिंकता आल्या नव्हत्या, शिवसेना ठाकरे पक्षाचे सुतार आणि मोकाटे यांचीही या भागात ताकद आहे, त्यामुळे आता या दोघांपैकी एकाला पक्षात घेऊन सर्वच्या सर्व चार जागा जिंकण्याची रणनीती भाजपकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रभागातील आरक्षण
‘अ’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
‘ब’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
‘क’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
‘ड’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग
विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार
भाजप : नीलेश कोंढाळकर, दुष्यंत मोहोळ, श्याम देशपांडे, गिरीश भेलके, उदय कड, वासंती जाधव, हर्षाली माथवड, पल्लवी गाडगीळ, कांचन कुंबरे, अजित जगताप, सुजाता जगताप, पुनीत जोशी, हृषिकेश सुतार,
शिवसेना (ठाकरे गट) : पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, उमेश भेलके, शांताबाई भेलके, वर्षा कुलकर्णी, प्रज्ञा लोणकर, भारती भोपळे, सविता वायकर.
मनसे : सुधीर धावडे, हेमंत संभूस, किशोर शिंदे, सुप्रिया काळे, पद्मजा संभूस, संजय काळे, शशांक अमराळे.
काँग््रेास : महेश विचारे, राजेंद्र मगर.
शिवसेना (शिंदे गट) : नितीन शिंदे.
राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) : गिरीश गुरनानी.