PMC Election: प्रभाग २२; काँग्रेसचा गड टिकणार की भाजप पुन्हा सुरुंग लावणार? निवडणूक रंगणार रंगतदार

सीमा बदल, मतदारसंख्येतील समीकरणे, झोपडपट्टी पुनर्वसन आणि बहुकोनी उमेदवारांच्या स्पर्धेमुळे प्रभाग २२ मधील लढत अधिकच चुरशीची
PMC Election
PMC ElectionPudhari
Published on
Updated on

निनाद देशमुख

महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या काशेवाडी-डायसप्लॉट प्रभागात (क्र. 22) भाजपने सुरुंग लावत दोन उमेदवार निवडून आणले होते. या प्रभागात आता डायसप्लॉट, मीरा आणि आनंद सोसायट्यां-सारख्या भागांचा समावेश केला असून, ही बाब भाजपसाठी अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. आगमी निवडणुकीत या प्रभागात काँग्रेस विरुद्ध भाजप या पक्षांत लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आपला गड टिकवणार की, भाजप पुन्हा त्याला सुरुंग लावणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PMC Election
PMC Election: भवानी पेठ प्रभाग ‘जैसे थे’! अरुंद रस्ते, कोंडी, कचरा, अतिक्रमणांचा रोजचा त्रास कायम

प्रभागाची लोकसंख्या 79 हजार 703 इतकी आहे. यात सुमारे 19 हजार मुस्लिम मतदार, 17 हजार जैन-मारवाडी समुदाय, 12 हजार नवबौद्ध, 8 हजार मातंग, 1800 मेहतर वाल्मिकी, 4500 पद्मशाली, 2500 मराठा आणि 800 माळी समाजातील नागरिकांचा समावेश आहे. हा प्रभाग गेली अनेक वर्षे काँग्रेसचा सुरक्षित गड मानला जात होता. मागील निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला होता. मात्र आगामी निवडणुकीत काँग्रेसला महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) साथ दिल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. कसबा आणि कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या या प्रभागात आता मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. ए. डी. कॅम्प चौक, लक्ष्मीबाजार, रामोशी गेट, मटण मार्केट, भवानी पेठ (830, 824), साठे कॉलनी, एकबोटे कॉलनी आदी भाग वगळून आता या प्रभागात आनंद सोसायटी, मीरा सोसायटी, ढोलेमळा, महावीर प्रतिष्ठान, यासिन जोग दर्गा परिसर, इन्कम टॅक्स कॉलनी, पीएमटी कॉलनी आणि डायसप्लॉट झोपडपट्टी परिसराचा समावेश करण्यात आला आहे. भाजपला अनुकूल असल्याने हा बदल जाणीवपूर्वक केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 2017 मधील निवडणुकीत या प्रभागातून काँग्रेसचे अविनाश बागवे, रफिक शेख आणि भाजपच्या अर्चना पाटील, मनीषा लडकत यांनी विजय मिळवला होता. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही या प्रभागात भाजपला चांगले मताधिक्य मिळाले होते. यामुळे भाजपने या प्रभागातील चारही जागा निवडून आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. मात्र पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

PMC Election
MCOCA Accused Pune: दीड वर्षांपासून फरार मोक्का आरोपीला खंडणीविरोधी पथकाची बेड्या

भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना पाटील आणि मनीषा लडकत पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मनीषा लडकत यांचे पती माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संदीप लडकत यांचे बंधू हरिष लडकत हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. कॉँग्रेसचे अविनाश बागवे यांनी देखील सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर त्यांची पत्नी इंदिरा बागवे या अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. एकाच घरांतून दोघांना तिकीट दिल्यास भाजप आणि कॉँग्रेसमधील इच्छुकांमध्ये नाराजी नाट्य उद्भवण्याची शक्यता आहे. महापालिकेची 2012 मधील निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढविल्याने त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला होता. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी झाल्यास झोपडपट्टीतील मतदार, पारंपरिक समर्थक आणि तटस्थ गट कॉंग्रेसच्या बाजूने येऊ शकतात. असे झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी हे मुद्दे निवडणुकीतील प्रचारात केंद्रस्थानी राहणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या अपयशाचे खापर भाजप काँग्रेसवर फोडत आहे. तर काँग्रेस भाजपवर जातीय धुवीकरण आणि विकासकामांना अडथळे निर्माण केल्याचा आरोप करीत आहे. महायुतीमध्ये सध्या एकजूट दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, महेश गायकवाड, शांतिलाल मिसाळ आदींनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून (ठाकरे गट) अनिल दामजी, भारती दामजी, जावेद खान, पद्मा सोरटे, रमेश परदेशी आदींची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेची (शिंदे गट) ताकद या प्रभागात मर्यादित आहे. सध्याचे राजकीय चित्र पाहता या प्रभागातील निवडणूक रंगतदार होणार आहे.

PMC Election
Vanawadi Godown Fire: वानवडीतील मंडप साहित्य गोडाऊनला भीषण आग; लाखोंचे नुकसान

प्रभागातील आरक्षण

  • ‌‘अ‌’ गट : अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला)

  • ‌‘ब‌’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग

  • ‌‘क‌’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)

  • ‌‘ड‌’ गट : सर्वधारण प्रवर्ग

PMC Election
Dr Shankar Mugave: डॉ. शंकर मुगावे यांच्यावर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान समन्वयकपदाची जबाबदारी

विविध पक्षांतील इच्छुक उमेदवार

भाजप : अर्चना पाटील, मनीषा लडकत, संदीप लडकत, दिनेश रासकर, सुखदेव अडागळे, मृणाल कांबळे,

छगन बुलाखे, चेतन चावीर, विकी ढोले, रफिक हबिब शेख, अनिल भिसे, सुवर्णा भिसे, बापू कांबळे, मनीष सोनिग्रा, कणव चव्हाण, निर्मल जैन. काँग््रेास : अविनाश बागवे, रफिक शेख, शानूर शेख, इंदिरा बागवे, सादिक लुकडे, चेतन अग््रावाल, बिना अग््रावाल, जुबेर दिल्लीवाले, नुरजहा दिल्लीवाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : नरेश पगडालू, जुबेर बाबू शेख, फिरोज तांबोळी, किरण जगताप, संजय गायकवाड, युसूफ शेख, प्रज्वल बनकर, योगेश पावर. शिवसेना

(ठाकरे गट) : अनिल दामजी, भारती दामजी, जावेद खान, पद्मा सोरटे, रमेश परदेशी, सचिन घोलप, शंकर साठे, चंदन भेंडवाल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) :

दत्ता जाधव, निकिता जाधव, महेश गायकवाड, शांतिलाल मिसाळ, नरेश जाधव, हरिश लडकत. रिपाइं : रोहित कांबळे, लियाकत शेख, अशोक शिरोळे, संदीप धांडोरे, राजेश गाडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news