दापोडतील विनियार्ड चर्चमध्ये देखाव्यांची सजावट | पुढारी

दापोडतील विनियार्ड चर्चमध्ये देखाव्यांची सजावट

बालचमूंना भेटणार सांताक्लॉज

दापोडी : पुढारी वृत्तसेवा : येथील विनियार्ड वर्कर्स ऑफ ख्राईस्ट चर्चला ख्रिसमस (नाताळ) सणासाठी रंगरंगोटी भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

योग्य ठिकाणी सूचनाफलक तयार करण्यात आले आहेत. शनिवारी बालचमूंना सांताक्लॉज भेटणार असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

थरार : पट्टेदार वाघाकडून गाईची शिकार; गुराख्याने हुसकावले, पण…

नाताळ दापोडी येथील विनियार्ड चर्च मध्ये साजरा होत आहे. खिसमस नाताळ सणासुदीच्या निमित्ताने येथील चर्च सज्ज झाले आहे. चर्चमध्ये येशू ख्रिस्त यांचे जन्म ठिकाण असलेले बेथलेम ठिकाणाची हुबेहुब प्रतिकृती साकारताना येथील ख्रिसमस बांधव दिसून आले.

चर्चमध्ये एकूण एक हजार जणांची बैठक व्यवस्था आहे, मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पाचशे जणांना शुक्रवारी सायंकाळी प्रार्थना साठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.

चंद्रपूर : ७४ वर्षीय म्हाताऱ्याचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

चर्चमध्ये जोशुवा युथ आणि त्यांची सर्व टीम क्रिसमसची सर्व सजावट करण्यात मग्न आहेत. येथील चर्चमध्ये इस्त्राईल येथून आलेले येशूचे जन्माचे शिल्प चित्र उभारून त्याभोवती वाळलेल्या गवताच्या सहाय्याने झोपडी तयार करण्यात आली आहे. बालचमूंनी तयार केलेले सांताक्लॉज.

हरीण क्रिसमस ट्री येथे उभारण्यात आल्याने गर्दी पहावयास मिळत आहे.विनियार्ड चर्च मध्ये दापोडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, कासारवाडी, फुगेवाडी आदी परिसरातील ख्रिसमस बांधव दरवर्षी येथे नाताळ सणाला मोठी गर्दी करीत असतात.

लुधियाना न्‍यायालयात स्‍फोट, २ ठार, चार गंभीर

मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही प्रशासनाने सर्व नियम, फिजिकल डिस्टन्सचे पालन करून हा सण साजरा करण्यात येणार असल्याचे यावेळी ब्रदर मुरली रावला व पास्टर राहुल वाघमारे यांनी या प्रसंगी संगितले.

Back to top button