नागभीड : ७४ वर्षीय म्हाताऱ्याचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

नागभीड : ७४ वर्षीय म्हाताऱ्याचा दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी ऑनलाईन : एका ७४ वर्षीय म्हाताऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना १७ डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील किरमिटी (मेंढा) येथे घडली. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सर्वस्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पांडुरंग लवाजी बावणे (७४) असे या आरोपीचे नाव आहे.

म्हाताऱ्या आरोपीने गावाशेजारील (नागभीड) बोरे वेचत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने जवळच असलेल्या एका घरात नेऊन अत्याचार केला. याबद्दल कुणाला सांगितले तर मारण्याची धमकी दिली. म्हाताऱ्याने हे चाळे ज्या घरात केले तेव्हा त्याच घरात दुसरी एक मुलगी जेवण करीत होती. त्या मुलीवरही या म्हाताऱ्याने वक्रदृष्टी टाकली. तिच्यावरही त्याने अत्याचार केला. म्हाताऱ्याने या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास मारण्याची दमदाटी केल्याने त्या मुलींनी सदर प्रकार कुठेच सांगितला नाही.

या घटनेमुळे दोन्ही पीडित मुली दोन-तीन दिवस अबोल स्वरूपात राहत होत्या. मुलीसोबत काहीतरी घडले असावे, असा संशय वडिलांना आला. मुलीची आई यावेळी बाहेरगावी गेली होती. मुलीच्या आईला गावी बोलावले असता मुलीने आईजवळ सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर मुलीच्या पालकांनी नागभीड पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार नोंदवली.

प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (१ए), ३७६ (एबी), ५०६ सहकलम ४, ६, १० बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आर. बी. मेढे, सपोनि पूनम पाटील करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news