पिंपरीत नाही ओमायक्रॉनचा एकही रुग्ण | पुढारी

पिंपरीत नाही ओमायक्रॉनचा एकही रुग्ण

सर्व 10 रुग्ण झाले बरे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील ओमायक्रॉनचे सर्व 10 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना टप्पाटप्पाने घरी सोडण्यात आले. सध्या शहरात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही. ती शहरासाठी दिलासादायक बाब आहे.

नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आपल्या भावास भेटण्यास आलेल्या एका महिलेस तिच्या दोन्ही मुलींना तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली होती.

आधारकार्डची मतदान ओळखपत्राशी होणार जोडणी; विधेयक लोकसभेत मंजूर

त्यांच्यावर महापालिकेच्या पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी 4 जणांना 10 डिसेंबरला घरी सोडण्यात आले.

उर्वरित सहा रुग्णांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याने त्यांनाही नुकतेच घरी सोडण्यात आले. ते होम आयसोलेट आहेत. सध्या, शहरातील एकही रूग्ण ओमायक्रॉन बाधित नाही.

ऋता दुर्गुळे हिचा बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक व्हिडिओ व्हायरल ❤️

शहराबाहेर वास्तव्यास असलेला ओमायक्रॉनचा एक रुग्ण रविवारी (दि.19) आढळून आला. त्याच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

परदेशातून शहरात आलेल्या एकूण 1 हजार 3 जणांचीं तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 728 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, परदेशातून आलेले 19 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

थंडीच्या लाटेत विदर्भ गारठला

त्यांच्या संपर्कात आलेले 21 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, तब्बल 688 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेशातून आलेले 4 जणांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्यापैकी 10 रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाचे 9 रुग्ण भोसरी रुग्णालयात तर, 3 रुग्ण खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित कोरोनाचे 28 रुग्ण बरे झाल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले आहे.

Back to top button