ऋता दुर्गुळे हिचा बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक व्हिडिओ व्हायरल ❤️

hruta durgule
hruta durgule
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

फुलपाखरू फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिचा बॉयफ्रेंडसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दिग्दर्शक प्रतिक शाह याच्यासोबत ती रिलेशनमध्ये असल्याचे उघड झाले आहे. तिने बॉयफ्रेंडचे नाव जाहीर करत प्रतिकसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात दिसताहेत. दरम्यान, ऋता दुर्गुळे हिचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

ती बॉयफ्रेंड प्रतिकसोबत या व्हिडिओत दिसत आहे. दोघेही व्हिडिओमध्ये रोमँटिक अंदाजात दिसताहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ऋताने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड प्रतिकसोबत दिसत आहे. या व्हिडिओत मागे आर माधवनचा सुपरहिट चित्रपट 'रेहना है तेरे दिल मे' चित्रपटातील रोमँटिक गाणे वाजते. दोघेही एकमेकांकडे पाहत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने या व्हिडिओला दोन हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत.❤️❤️ दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून अनेकांनी गोड कॅप्शन्सदेखील दिल्या आहेत. तर काहींनी भरभरून कमेंट्सदेखील केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी तिने दोघांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. यामध्ये तिने म्हटले होते-How did I get so lucky ?! ❤️??Thank you @prateekshah1 for existing ✨? Here's to a lifetime of never ending laughter attacks , nonstop blabbering , unreasonably happy friendship and lifelong faithful love ❤️ Here's to today and forever ✨?

२५ डिसेंबर रोजी ऋता आणि प्रतिक साखरपुडा करणार आहेत. खुद्द ऋताने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले होते. त्यामुळे ऋताच्या साखरपुड्याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.

सध्या ऋता मन उडू उडू झालं मालिकेत दिसतेय. ती 'फुलपाखरू' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचली होती. ऋता सोशल मीडियावरही सक्रिय असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news