पुणे विमानतळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे जंगी स्वागत | पुढारी

पुणे विमानतळावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे जंगी स्वागत

पुणे ; पुढारी वृत्‍तसेवा केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ आज (शनिवार) सकाळी पहिल्यांदाच पुण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील पुणे विमानतळावर मोहोळ यांचे जंगी स्वागत केले.

ढोल ताशा, हलगी, आणि वारकऱ्यांच्या वेषातील मुलांनी मोहोळ यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोहोळ यांना खांद्यावर उचलून घेत त्यांना पगडी परिधान केली. पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

दुसऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळावर येणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या स्वागतासाठी आज इतकी गर्दी झाली, हे फक्त भारतीय जनता पार्टितच होऊ शकते. मला आज खूप आनंद होत आहे. शहरातील आणि राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार
– केंद्रीय मंत्री मोहोळ

हेही वाचा : 

Back to top button