PM-KISAN 17th instalment : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : उद्या जमा होणार पीएम किसानचा 17 वा हप्ता

PM-KISAN 17th instalment : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : उद्या जमा होणार पीएम किसानचा 17 वा हप्ता

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी ( १८ जून) पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार आहे. वाराणसी येथील सभेतून देशातील ९.२६ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना जवळपास २० हजार कोटी रुपये वितरीत करण्यात येणार असल्याचे  वृत्त 'ANI'ने दिले आहे. (PM-KISAN 17th instalment)

सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१७ जून) त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. येथील शेतकरी सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. या प्रसंगीच पंतप्रधान मोदी केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जमा करणार आहेत. (PM-KISAN 17th instalment)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news