पहाटे गार वारा तर दुपारी अंगाची लाही-लाही : माणसांसह पशू-पक्षीही उकाड्याने हैराण | पुढारी

पहाटे गार वारा तर दुपारी अंगाची लाही-लाही : माणसांसह पशू-पक्षीही उकाड्याने हैराण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात पहाटे गार वारे सुटत आहेत. मात्र, त्यानंतर काही वेळातच उन्हाचा तडाखा सुरू होऊन दिवसभर आणि रात्री अंगाची काहिली करणारा उष्मा जाणवत आहे. सोमवारी (दि.6) असेच वातावरण शहरात होते. माणसांसह पशू-पक्षीही उकाड्याने हैराण झाल्याचे द़ृश्य दिसून आले. शहरात सोमवारी कमाल तापमानात किंचित घट दिसून आली. शिवाजीनगरचा पारा 40.3 अंशांवर होता, तर कोरेगाव पार्क, मगरपट्टा, लवळे, चिंचवड भागाचे तापमान 42 वरून 39 ते 40 अंशांवर खाली आले. या भागातील कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली.

सकाळी 7.30 पर्यंत जाणवला गारवा

शहरात पहाटे सहापर्यंत गार वारे राहतात. सकाळी सात नंतर मात्र प्रखर उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. मात्र, सोमवारी सकाळी 7.30 पर्यंत गारवा जाणवत होता. उन्हाचा चटका नऊनंतर जाणवायला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र दिवसभर शहरात कमालीचा उकाडा जाणवत होता. माणसांसह पशू-पक्षीही पाण्यासाठी कासावीस झालेले द़ृश्य शहरात दिसले.

सोमवारचे शहराचे कमाल-किमान तापमान

शिवाजीनगर 40.3( 24.6), पाषाण 39 (23.1), लोहगाव 39 (23.9), चिंचवड 39 (24.9), लवळे 40 (24.3), मगरपट्टा 41 (27.2), एनडीए 38 (20.5), कोरेगाव पार्क 39 (26.4).

हेही वाचा

Back to top button