जंगली महाराज रस्त्यावरील ‘अर्बन स्ट्रीट’चे तीनतेरा; दुचाकी पार्किंगमुळे दुरवस्था | पुढारी

जंगली महाराज रस्त्यावरील ‘अर्बन स्ट्रीट’चे तीनतेरा; दुचाकी पार्किंगमुळे दुरवस्था

हिरा सरवदे

पुणे : अर्बन स्ट्रीट प्रोग्रामअंतर्गत महापालिकेने केलेल्या जंगली महाराज रस्त्याच्या सुशोभीकरणाची पुरती वाट लागली आहे. सुशोभीकरणाचा प्रमुख भाग असलेली पदपथावरील हिरवळ नाहिशी झाली असून, झाडांचीही वाताहत झाली आहे. अनेक ठिकाणी पदपथ आणि सायकल ट्रॅकवर व्यावसायिक अतिक्रमण केल्याने वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता या
संकल्पनेचे तीनतेरा वाजले आहेत.

अर्बन स्ट्रीट डिझाइन गाईड लाईनला मान्यता मिळाल्यानंतर 2016 मध्ये महापालिकेने पुणे स्ट्रीट प्रोग्रामचे नियोजन करून शहरातील रस्ते ’वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता’ या संकल्पनेवर सुशोभित करण्याचे नियोजन केले. या संकल्पनेवर आधारित महापालिकेने सर्वप्रथम जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण केले. यामध्ये वाहनांसाठी मार्गिकेसोबत पादचारी मार्ग, पादचार्‍यांसाठी पुरेसा पदपथ, सायकल ट्रॅक, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगव्यवस्था, हिरवळ आणि विविध झाडे, नागरिकांना बसण्यासाठी सुशोभित बाकडी, फरशी टेबल, सायकल स्टँड आदींचा समावेश आहे.

जंगली महाराज रस्त्याला स्मार्ट सिटीसह इतर पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिकेने गोखले रस्ता (फर्ग्युसन), बिबवेवाडी रस्ता, सातारा रस्ता, राजभवन रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, औंध डीपी रस्ता, पाषाण-सूस रस्ता, कर्वे रस्त्याचा काही भाग, अशा एकूण 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सुशोभीकरण केले. आता मात्र जंगली महाराज रस्त्यावरील सुशोभित पदपथाची पुरती वाट लावली आहे. पदपथ आणि सायकल ट्रॅकवर दुचाकी वाहने येऊ नयेत म्हणून उभे केलेले सिमेंटचे बहुतांस खांब खराब झाले आहेत तर काही तुटून पडले आहेत.

नागरिकांसाठी मोठे आणि सुशोभित केलेल्या पदपथावर अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. याशिवाय सुशोभीकरणांतर्गत करण्यात आलेली हिरवळ नाहीशी होऊन त्या ठिकाणी राडारोडा आणि कचर्‍याचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी हिरवळीच्या भागातच दुचाकी पार्किंग केल्या जातात. त्यामुळे वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता संकल्पनेच्या नावाखाली सुशोभीकरणासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचे चित्र दिसत आहे.

इथे काय दिसते?

  • पावसाळी लाइनवरील चेंबरची मोडतोड झाली आहे.
  • सुशोभित पदपथावर अनेक ठिकाणी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले.
  • कचर्‍याचे वर्गीकरण पदपथावरच केले जाते.
  • पदपथावर व पार्किगमध्ये अनेक दुचाकी बेवारसपणे धूळ खात उभ्या.
  • सुशोभित पदपथावर अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग.
  • हिरवळीसाठी केलेल्या ठिबक सिंचनाचे पाइप अस्ताव्यस्त पडलेले.

चक्क पोलिसच लावतात पदपथांवर दुचाकी

बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलिस चौकी आहे. सामान्य नागरिकांनी पदपथावर दुचाकी पार्क केली, तर वाहतूक पोलिस त्यावर दंडात्मक कारवाई करतात. मात्र, या ठिकाणी बालगंधर्व पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी आपल्या दुचाकी पोलिस चौकीसमोरील जागेसह सुशोभित पदपथावर पार्क करतात. त्यातच बालगंधर्वमध्ये एखादा राजकीय नेत्याचा कार्यक्रम असल्यास नागरिकही या सुशोभित पदपथावर दुचाकी पार्क करतात. त्यामुळे हा पदपथ नागरिकांसाठी आहे की दुचाकींच्या पार्किंगसाठी? असा प्रश्न पडतो.

अर्बन स्ट्रीट डिझाइन गाईड लाईनला मान्यता मिळाल्यानंतर 2016 मध्ये महापालिकेने पुणे स्ट्रीट प्रोग्रामचे नियोजन करून शहरातील रस्ते ’वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता’ या संकल्पनेवर सुशोभित करण्याचे नियोजन केले. या संकल्पनेवर आधारित महापालिकेने सर्वप्रथम जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण केले. यामध्ये वाहनांसाठी मार्गिकेसोबत पादचारी मार्ग, पादचार्‍यांसाठी पुरेसा पदपथ, सायकल ट्रॅक, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगव्यवस्था, हिरवळ आणि विविध झाडे, नागरिकांना बसण्यासाठी

सुशोभित बाकडी, फरशी टेबल, सायकल स्टँड आदींचा समावेश आहे.
जंगली महाराज रस्त्याला स्मार्ट सिटीसह इतर पुरस्कार मिळाल्यानंतर महापालिकेने गोखले रस्ता (फर्ग्युसन), बिबवेवाडी रस्ता, सातारा रस्ता, राजभवन रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, औंध डीपी रस्ता, पाषाण-सूस रस्ता, कर्वे रस्त्याचा काही भाग, अशा एकूण 35 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सुशोभीकरण केले. आता मात्र जंगली महाराज रस्त्यावरील सुशोभित पदपथाची पुरती वाट लावली आहे. पदपथ आणि सायकल ट्रॅकवर दुचाकी वाहने येऊ नयेत म्हणून उभे केलेले सिमेंटचे बहुतांस खांब खराब झाले आहेत तर काही तुटून पडले आहेत.

नागरिकांसाठी मोठे आणि सुशोभित केलेल्या पदपथावर अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. याशिवाय सुशोभीकरणांतर्गत करण्यात आलेली हिरवळ नाहीशी होऊन त्या ठिकाणी राडारोडा आणि कचर्‍याचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी हिरवळीच्या भागातच दुचाकी पार्किंग केल्या जातात. त्यामुळे वाहतूक सुरक्षितता आणि पादचारीपूरक रस्ता संकल्पनेच्या नावाखाली सुशोभीकरणासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा

Back to top button