पिरंगुटमध्ये थरार ! सराईत गुन्हेगाराचा पोलिसांवर गोळीबार; पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ तीन राउंड फायर | पुढारी

पिरंगुटमध्ये थरार ! सराईत गुन्हेगाराचा पोलिसांवर गोळीबार; पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ तीन राउंड फायर

पुणे/पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : दरोड्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करताना त्याने पोलिस पथकावर पिस्तुलातून गोळी झाडली. दरम्यान, स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील त्याच्यावर तीन राउंड फायर केले. यानंतर त्याच्या दुचाकीला गाडी आडवी घालून त्याला साथीदारासह जेरबंद केले. हा थरार मुळशी तालुक्यातील मुठा-बहुली रस्त्यावर मंगळवारी (दि. 23) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. ही धडाकेबाज कामगिरी करणार्‍या पथकाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

अजिंक्य ऊर्फ नवनाथ नीलेश वाडकर (वय 19, रा. जनता वसाहत), केतन सुरज साळुंके (वय 19, रा. राजेंद्रनगर) अशी सराइतांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार अनिल कुसाळकर यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार आहे.
फतो सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता.

याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून खंडणीविरोधी पथक-2 त्याच्या मागावर होते. मंगळवारी सकाळी पोलिसांना वाडकर मुळशी भागात असल्याचे समजले. सिद्धेश्वरवाडी येथील एका व्यक्तीने वाडकर चार-पाच दिवसांपूर्वी खरवडे भागात भेटल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक काळ्या रंगाची मोपेड दुचाकी आहे. दुपारी दोनच्या सुमारास वाडकर भुगावच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसला. दोन गाड्यांतून पोलिस त्याचा पाठलाग करीत होते. पोलिस हवालदार दिलीप गोरे यांनी त्याला थांबण्याचा
इशारा केला. मात्र, त्याने दुचाकी पळवली.

पोलिस आल्याची चाहूल लागताच वाडकरने गोरे यांच्या दिशेने गोळी झाडली तसेच त्याचा मोबाईल फेकून मारला. गोरे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी गाडी त्यांच्या अंगावर घातली. या वेळी प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी हवेत दोन आणि वाडकरच्या दुचाकीच्या चाकावर एक, अशा तीन गोळ्या झाडल्या. याचवेळी दुसर्‍या गाडीतील पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांनी दोघांना गाडीने दाबले. त्यानंतर दोघांना पकडण्यात आले. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस कर्मचारी दिलीप गोरे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, ज्ञानेश्वर पालवे, प्रशांत शिंदे, गणेश खरात, संग्राम शिनगारे, पवन भोसले, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, प्रदीप शितोळे यांच्या पथकाने केली.

तो सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांना हुलकावणी देत नवनाथने पळ काढला होता. याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून खंडणीविरोधी पथक-2 त्याच्या मागावर होते. मंगळवारी सकाळी पोलिसांना वाडकर मुळशी भागात असल्याचे समजले. सिद्धेश्वरवाडी येथील एका व्यक्तीने वाडकर चार-पाच दिवसांपूर्वी खरवडे भागात भेटल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक काळ्या रंगाची मोपेड दुचाकी आहे. दुपारी दोनच्या सुमारास वाडकर भुगावच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसला.

दोन गाड्यांतून पोलिस त्याचा पाठलाग करीत होते. पोलिस हवालदार दिलीप गोरे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने दुचाकी पळवली. पोलिस आल्याची चाहूल लागताच वाडकरने गोरे यांच्या दिशेने गोळी झाडली तसेच त्याचा मोबाईल फेकून मारला. गोरे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनी गाडी त्यांच्या अंगावर घातली. या वेळी प्रसंगावधान राखत पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांनी हवेत दोन आणि वाडकरच्या दुचाकीच्या चाकावर एक, अशा तीन गोळ्या झाडल्या. याचवेळी दुसर्‍या गाडीतील पोलिस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांनी दोघांना गाडीने दाबले. त्यानंतर दोघांना पकडण्यात आले.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे शैलेश बलकडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलिस कर्मचारी दिलीप गोरे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, ज्ञानेश्वर पालवे, प्रशांत शिंदे, गणेश खरात, संग्राम शिनगारे, पवन भोसले, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, प्रदीप शितोळे यांच्या पथकाने केली.

गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस देखील आता गुन्हेगारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतील.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर

हेही वाचा

Back to top button