Loksabha election | राजगड तालुका दत्तक घेणार : अजित पवार | पुढारी

Loksabha election | राजगड तालुका दत्तक घेणार : अजित पवार

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकार असताना खासदार व आमदार एकत्रित आले नाहीत. त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केले, अशी टीका करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान करावे. राजगड (वेल्हे) तालुका विकासासाठी दत्तक घेतला जाईल, असे आश्वासन रविवारी (दि. 5) वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना केले.

दिवंगत आमदार काशिनाथ खुतवड यांच्या आठवणींना उजाळा देत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गुंजवणीचे पाणी प्रथम राजगड तालुक्यातील शेतकर्‍यांना दिले जाईल. आचारसंहिता संपल्यावर प्रशासकीय इमारतीचे काम मार्गी लावले जाईल. तालुक्यात अभियांत्रिकी महाविद्यालय, पाबे घाट बोगदा आदी कामे मार्गी लागतील. पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवानराव पासलकर, जिल्हा बँकेचे संचालक रघुनाथ धारवडकर, निर्मला जागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, शिवसेनेचे बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, मनसे तालुकाध्यक्ष दिगंबर चोरगे, भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद देशमाने, रिपाइंचे अध्यक्ष कुंदन गंगावणे, सुनील शेंडकर, माजी उपसभापती अनंत दारवटकर, सुनील जागडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button