खा. सुप्रिया सुळेंना धक्का : महाविकास आघाडीतून कुलदीप कोंडेंचा महायुतीत प्रवेश | पुढारी

खा. सुप्रिया सुळेंना धक्का : महाविकास आघाडीतून कुलदीप कोंडेंचा महायुतीत प्रवेश

पुणे : पुढारी : वृत्तसेवा : सलग दोन वेळा भोर विधानसभेची आमदारकी लढवणारे ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते कुलदीप कोंडे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडले असून शिंदे गटाच्या शिवसेना पक्षामध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. कोंडे यांच्या पक्षप्रवेशामुळे सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघाडीतील धुसफूसमुळे भोरमध्ये ठाकरे गट अस्थिर होता. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याने मतभेदात आणखी भर पडली होती. कुलदीप कोंडे सह त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम दैनिक पुढारी मधून सोमवार ( दि. १५ ) रोजी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. कुलदीप कोंडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने दैनिक पुढारीचा अंदाज खरा ठरला.

पुणे येथे झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ठाकरे गटाचे शिवसेना नेते कुलदीप कोंडे यांनी शिंदे गटाच्या शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठ्या प्रमाणात मताधिक्य घटणार असल्याचे राजकीय विश्लेषक अंदाज लावत आहे. तसेच आगामी भोर विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिवसेना मधील काहींनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. त्यांच्या मात्र भुवया उंचावल्या असल्याची चर्चा झडत आहे.

कुलदीप कोंडे यांची राजकीय पकड…

कुलदीप कोंडे हे शेतकरी कुटुंबातील असून कोणताही राजकीय वारसा नसताना केळवडे गावच्या उपसरपंच पदापासून ते दोन टर्म जिल्हा परिषदेवर पकड ठेवली आहे. पहिल्या टर्मला सन २०१२ मध्ये ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. तर दोन पंचायत सदस्य निवडून आणून भोर पंचायत समितीवर भगवा फडकवला होता. २०१७ मध्ये त्यांच्या पत्नी शलाका कोंडे या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या.

तर पंचायत समितीवर एक सदस्य निवडून आणून महामार्ग पट्ट्यात आपली पकड कायम ठेवली आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत थोपटे आणि कोडे यांच्यात दुसऱ्यांदा दुरंगी लढत झाली. या अटीतटीच्या नवतीत एकूण ३,६१,७६४ मतदानापैकी २.२८.२६४ मतदान झाले. यात आमदार थोपटे यांना १०८९२५ झाले ४७. ७२ टक्के मतदान तर कोडे यांना ९९७१६ म्हणजे ४३.६९ यके मतदान झाले. अत्यंत चुरशीच्या या लड़तीत ९२०६ मतानी आमदार थोपटे विजयी झाले होते. एकंदरीत केवळ कोंडे यांचा साडेचार हजाराच्या फरकाने पराभव झाला होता.

हेही वाचा

Back to top button