Pune : बाणेरला अतिक्रमणांवर धडक कारवाई ! | पुढारी

Pune : बाणेरला अतिक्रमणांवर धडक कारवाई !

बाणेर : पुढारी वृत्तसेवा : बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोडवरील अनधिकृत शेड, दुकाने तसेच बालेवाडी फाट्यालगतची अनधिकृत दुकाने, हॉटेल आणि ’साईड मार्जिन’मधील बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ताम्हाणे चौकालगत असलेले अनधिकृत शेडही काढण्यात आले. या कारवाईत सुमारे 20,000 चौरस फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले. बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक तीनच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, बांधकाम विभाग झोन क्र. तीनचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता संदीप चाबुकस्वार, अजित सणस, केतन जाधव, कनिष्ठ सहायक अभियंता सुदर्शन मस्के, रोहित बरकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने वारंवार अनधिकृत पत्राशेड व बांधकामांवर कारवाई करण्यात येते, परंतु त्यानंतर एक ते दोन दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकदा कारवाई झाली की पुन्हा लवकर कारवाई होत नाही, असा समज व्यावसायिकांचा झाला असून, त्यामुळे ते बिनधास्तपणे पुन्हा अतिक्रमणे करीत आहेत. यामुळे प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच किरकोळ व्यावसायिकां बरोबरच मोठमोठे हॉटेल व पबच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

हेही वाचा

Back to top button