Vijay Shivtare News: कार्यकर्त्यांशी बोलूनच निर्णय घेणार! विजय शिवतारेंची भूमिका | पुढारी

Vijay Shivtare News: कार्यकर्त्यांशी बोलूनच निर्णय घेणार! विजय शिवतारेंची भूमिका

पुणे: पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी सुमारे अडीच तास बैठक झाली. मतदार संघातील लोकांच्या भावना काय आहेत? या मी तिघांना कळवल्या आहेत. उद्या मी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीमध्ये काय झालं याची सगळी माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार आणि त्यानंतरच निर्णय घेणार अशी भूमिका शिंदे गटाचे माजी आमदार आणि नेते विजय शिवतारे यांनी आज (दि.२९) माध्यमांशी स्पष्ट केली. (Vijay Shivtare News)

राजकारणात आम्ही स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी लढत असतो. उद्याची बैठक करून परत मुंबईला जाईन, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. अजित पवार यांच्या वादावर शिवतारे यांनी असे सूचक वक्तव्य केले तसेच पुढे बैठकीत अजित दादांनी काय सांगितलं यावर बोलताना शिवतारेंनी हात जोडत या विषयावर बोलणे टाळले. (Vijay Shivtare News)

प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचे मत काय आहे? हे जाणून घेणार मग ते निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह, असेही ते म्हणाले. गरज वाटली तर प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार, असल्याचे देखील शिवतारे म्हणाले. जनतेचा आवाज बघून मी हे पाऊल उचललं होतं. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार असल्याचे शिवतारे म्हणाले. (Vijay Shivtare News)

हे ही वाचा:

Back to top button