शाळांना दिलासा ! ‘आरटीई’मध्ये शाळा नोंदणीसाठी 22 मार्चपर्यंत मुदतवाढ | पुढारी

शाळांना दिलासा ! ‘आरटीई’मध्ये शाळा नोंदणीसाठी 22 मार्चपर्यंत मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शासकीयसह खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेशासाठी राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर राबविण्यात येणार्‍या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणीसाठी 22 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 18) सायंकाळी पाचपर्यंत पुणे, पिंपरी व चिंचवड तसेच जिल्ह्यातील 5 हजार 883 शाळांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या (प्रा.) प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांनी दिली.
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियांना 6 ते 18 मार्च या कालावधीत नोंदणीच्या सूचना दिल्या होत्या.

जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे देण्यात आली आहे. यंदा शासकीय तसेच अनुदानित शाळांनाही प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण देण्यास काही काळ गेला. त्यामुळे शाळा नोंदणीसाठीची मुदत 22 मार्चपर्यंत वाढविण्यात आली. दरम्यान, सोमवारपर्यंत पुणे जिल्ह्यातील 4 हजार 632 शाळा पुणे शहरातील 793 व पिंपरी-चिंचवड भागातील 458 शाळांची नोंदणी झाल्याचे समन्वयक आरटीई समन्वयक वैशाली पांढरे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button