रिक्षाचालकांच्या दुखापतीला मदतीचा हात; जाणून घ्या काय आहेत तरतूदी | पुढारी

रिक्षाचालकांच्या दुखापतीला मदतीचा हात; जाणून घ्या काय आहेत तरतूदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी शासनाकडून 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या स्थापनेनंतर रिक्षाचालकांना कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यावर 50 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यासोबतच विविध फायदेदेखील रिक्षाचालकांना मिळणार आहेत. 2005 सालापासून प्रलंबित असलेली रिक्षाचालकांची ही मागणी अखेर पूर्ण झाली. त्यामुळे रिक्षाचालकांकडून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

शासनाने आमच्यासारख्या रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. आम्ही खूप आभारी आहोत. हे कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, ही मागणी खूप जुनी होती. ती आता पूर्ण झाली.

अनंता वीर, रिक्षाचालक

रिक्षाचालकांना कल्याणकारी मंडळ मिळावे, ही मागणी आमची 20 वर्षांपासून होती. ती पूर्ण झाली खरी, मात्र, आम्हाला रिक्षाचालक मालक यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ हवे होते. शासनाने आता यात टॅक्सीचालकांना देखील भरले आहे.

आबा बाबर, संस्थापक अध्यक्ष, शिवनेरी रिक्षा संघटना

मंडळांतर्गत रिक्षाचालकांना या सुविधा मिळणार

  • जीवन विमा, अपंगत्व विमा योजना
  • आरोग्यविषयक लाभ
  • कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य योजना (50 हजार रुपयांपर्यंत)
  • पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
  • महाराष्ट्र कामगार कौशल्य वृद्धी योजना

अशी आहे मंडळाची रचना

महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय मुंबईत असणार आहे. राज्यस्तरीय कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष परिवहनमंत्री असणार आहेत. तर सदस्य म्हणून राज्याचे परिवहन आयुक्त असतील. जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असणार आहेत.

हेही वाचा

Back to top button