पुणे: दोन हजार रुपयांची लाच घेतांना राजगुरुनगरचे तलाठी जाळ्यात | पुढारी

पुणे: दोन हजार रुपयांची लाच घेतांना राजगुरुनगरचे तलाठी जाळ्यात

राजगुरुनगर: पुढारी वृत्तसेवा : सात बारावरील नोंद घालण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्यावरून राजगुरुनगरचे तलाठी बबन लंघे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. सोमवारी (दि ३) दुपारी तीन वाजता ही कारवाई झाली. लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक प्रणिता सांगोरकर यांच्या मार्गदर्शनात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

खेड तालुक्यातील महसुल विभागातील सर्वच कार्यालयात काम करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात. प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. खेडच्या प्रांत, तहसीलदार यांच्याविरोधात खेड न्यायालयातील ५०० वकिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आजच्या कारवाईने या तक्रारीत तथ्य असल्याची चर्चा राजगुरुनगर शहर व तालुक्यात होत आहे. तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी देखील महसुल विभागाच्या कार्यप्रणाली वरून तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा 

Back to top button