पुणे पोलिसांची थेट दिल्लीत छापेमारी : 1200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त | पुढारी

पुणे पोलिसांची थेट दिल्लीत छापेमारी : 1200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

पुणे : कुरकुंभ एमआयडीसीमधील औषधाच्या कारखान्यात एमडीचे उत्पादन घेतले जात होते. पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी  छापा टाकून 1100 कोटी रुपयांचे तब्बल 600 किलो एमडी अमली पदार्थ जप्त केले होते. आता पुणे पोलिसांनी अशीच एक मोठी कारवाई दिल्ली येथेही केली. दिल्लीत केलेल्या कारवाईमध्ये 600 किलो एमडी ड्रग्स आढळून आले. तसेच पुणे पोलिसांनी दिल्लीतील दुसऱ्या कारवाईत 1200 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे.

पुणेमधील कुरकुंभ ता.दौंड औद्योगिक क्षेत्रातील अर्थ केम लॅबोरेटरीज कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला, त्या केलेल्या कारवाईत पुणे पोलिसांकडून ११०० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सगळ्यात मोठी कारवाई समजली जात आहे. अवघ्या तीन दिवसात पुणे पोलिसांनी 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एम डी ड्रग्स जप्त केले आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली कारवाई

  • फेब्रुवारी 18 : सोमवार पेठेतील छापेमारी मध्ये 2 किलो एम डी जप्त
  • फेब्रुवारी 19 : विश्रांतवाडी येथील गोदामातून 100 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे 55 किलो एमडी जप्त.
  • फेब्रुवारी 20: कुरकुंभ एम आय डी सी मधील एका कारखान्यात 110प कोटी रुपयांचे ड्रग्स आले आढळून
  • फेब्रुवारी 20: पुणे पोलिसांची थेट दिल्लीत कारवाई. 800 कोटी रुपयांचे 400 किलो एम डी केले हस्तगत.
  • फेब्रुवारी 21: पुणे पोलिसांच्या कारवाईमध्ये दिल्लीत 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे 600 किलो एमडी ड्रग्स आढळून आले.

हेही वाचा

Back to top button