उद्घाटनाच्या प्रतीक्षेत शिल्प : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

उद्घाटनाच्या प्रतीक्षेत शिल्प : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : अप्पर बिबवेवाडी परिसरातील स्वामी विवेकानंद रस्त्यावरील चिंतामणीनगर येथील तत्कालीन माननीयांच्या विकास निधीतून इंदिरानगर चौक ते अप्पर डेपोपर्यंत अनेक समूह शिल्प उभारण्यात आली आहेत अनेक शिल्पांची उद्घाटने झाली आहेत, तर काही शिल्प धूळखात पडून आहेत. हे काम सुचवणार्‍या माजी नगरसेवकांना व काम करून घेणार्‍या महापालिकेच्या जबाबदार अधिकार्‍यांना धूळखात पडलेले शिल्प दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध विकासकामे होत असताना नागरिकांच्या कररुपी पैशातून अर्धवट कामे करून पूर्ण पैसे लाटणार्‍या ठेकेदारांवर कोणाची मेहरबानी आहे, असे मत स्थानिक रहिवासी करत आहेत. जनतेचा पैशाची उधळपट्टी दिवसाढवळ्या होत असताना महापालिका प्रशासन पक्का आहे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गणेश मोहिते यांनी केला आहे. संबंधित महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते मिटींगला गेले आहेत असे सांगण्यात आले.

चिंतामणीनगर संविधान चौक इत्यादी परिसरातील विविध शिल्प तसेच रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक भिंत वाहनचालकांच्या अंगावर कधी पडेल हे सांगता येत नाही. महापालिका प्रशासन जनतेच्या पैशातून उभारलेल्या या शिल्पाकडे दुर्लक्ष का करत आहे. वापरात आणायचे नव्हते तर ही शिल्पे उभारली कशासाठी?

– गणेश मोहिते, अध्यक्ष, स्वामी समर्थ मंडळ, अप्पर बिबवेवाडी

हेही वाचा

Back to top button