ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली | पुढारी

ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिवनेरीवर परवानगी नाकारली

ओतूर : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नाशिकला जाण्यापूर्वी शिवजन्मस्थान शिवनेरी गडावर उतरून श्री छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाऊंचे दर्शन घेऊन पुढे जाणार होते. मात्र, केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने ठाकरे यांचे हेलिकॉप्टर शिवनेरी गडावर उतरविण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे शिवसैनिकांनी शिवजन्मभूमी येथील पवित्र मातीचा कलश नाशिकमध्ये जाऊन ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.

ठाकरे यांना शिवनेरीवर उतरून न दिल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याने त्यांनी चंग बांधून शिवजन्मभूमी येथील पवित्र मातीचा कलश घेऊन तो कलश पक्षप्रमुख ठाकरे व शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनभाऊ अहिर यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी समन्वयक शिवसेना पुणे संभाजी तांबे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, उपतालुकाप्रमुख भाऊ इसकांडे, विभागप्रमुख वैभव नलावडे, शिवसैनिक कैलास डुंबरे, भाऊसाहेब कडाळे, महादेव खंदारे, आशिष शहा व सेनेचे वितरक गणेश चौधरी उपस्थित होते. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने ही पवित्र भूमीतील माती सर्व जिल्ह्यांमध्ये पाठविली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button