मनोज जरांगेंचे प्रामाणिक प्रयत्न : आमदार अशोक पवार | पुढारी

मनोज जरांगेंचे प्रामाणिक प्रयत्न : आमदार अशोक पवार

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरात मनोज जरांगे यांचे स्वागत करण्यासाठी शिरूर शहरवासीय इच्छुक आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील असलेले जरांगे हे आज मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग घेत हातात घेतलेले काम तडीस जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे मत आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून मुंबई पदयात्रेला निघालेले मनोज जरांगे हे उद्या शिरूर शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर शहरवासीयांकडून जरांगे यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांना अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट, पाणी बॉटलचे बॉक्स, किराणा आदी देण्यात येणार आहे. यासाठी शहरातून शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फेरी काढली. या वेळी शहरवासीयांनी विविध वस्तू उत्स्फूर्तपणे दान केल्या. या वेळी पवार बोलत होते.

माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शहराध्यक्ष मुज्जफर कुरेशी, माजी युवक शहराध्यक्ष अमोल चव्हाण, तालुका युवती अध्यक्षा संगीता शेवाळे, शहराध्यक्षा गीताराणी आढाव, राणी कर्डिले, तालुका युवकाध्यक्ष तुषार दसगुडे, हाफिज बागवान, कलिम सय्यद, युवकाध्यक्ष अमित शिर्के, प्रवीण चोरडिया, राजउद्दीन सय्यद, प्रतीक काशीकर, मोहित साखला, वैभव जोशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button