Accident : कुरकुंभ-दौंड रस्त्यावर टँकर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली | पुढारी

Accident : कुरकुंभ-दौंड रस्त्यावर टँकर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ-दौंड रस्त्यावरील बस थांब्याजवळ भरधाव वेगात असलेला तेलाचा टॅकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र दोन ते तीन दुचाकीचे नुकसान झाले आहे. शनिवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास घडली. कुरकुंभ एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीसाठी दौंडहून तेलाचा पुरवठा केला जातो. मोठ्या टॅकरच्या माध्यमातून दररोज तेलाची वाहतुक केली जाते. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरून वरील वाहतुक दिवसभर सुरू असते. बहुतांश टॅकर चालक हे परप्रांतीय असून चालक नेहमी भरधाव वेगात असतात.

शनिवारी पहाटे दौंडहून टँकर (एमएच ०६ एक्यु ७५९४) तेल भरून भरधाव वेगात एमआयडीसीकडे निघाला होता. महामार्गावरील घटनास्थळी बस थांब्यावर कुरकुंभ, बारामती, फलटण, सातारा, सांगली अशा विविध ठिकाणी जाणारे प्रवाशी बसची वाट बघत थांबलेले होते. ज्या ठिकाणी प्रवाशी थांबले होते, तिथेच टॅकर पलटी झाला. टँकर पलटी होत असल्याचे लक्षात येताच येथील रिक्षाचालकांनी प्रवाशांना आवाज देऊन, ओढून बाजूला केले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र दोन ते तीन दुचाकी टॅकरखाली अडकल्या. घटनेनंतर टॅकर चालक पळून जाताना नागरीकांनी त्याला पकडले.

हेही वाचा

Back to top button