Jalgaon Lok Sabha | गळ्यात कापसाची व मक्याची माळ घालून मतदान, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून निषेध | पुढारी

Jalgaon Lok Sabha | गळ्यात कापसाची व मक्याची माळ घालून मतदान, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून निषेध

जळगाव | लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळपासून प्रारंभ झाला आहे. सकाळ पासून मतदार मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडलेले होते. अमळनेर येथे मतदारांनी गळ्यात मका व कापसाच्या माळा घालून निषेध नोंदवला व मतदान केले.  जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील यांची त्यांनी भेट घेतली.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर व जळगाव मतदार संघात 32 टक्के मतदान झालेले असताना प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करीत आहे. मात्र अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसाला व मक्याला भाव मिळत नसल्याने,  कापूस व मक्याची माळ गळ्यात घालून अंमळनेर या ठिकाणी मतदान केले. शेतकऱ्यांनी अशा अनोख्या पद्दतीने सरकारचा विरोध दर्शवला.  जळगाव मतदार संघातील उमेदवार करण पाटील पवार यांची मतदारांनी भेट घेतली.

हेही वाचा –

Back to top button