Pune Metro : मेट्रोचे काम सुरू असताना बाणेरमध्ये सापडला हॅण्डग्रेनेड | पुढारी

Pune Metro : मेट्रोचे काम सुरू असताना बाणेरमध्ये सापडला हॅण्डग्रेनेड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरातील आयसर या संस्थेजवळ खोदकाम करत असताना एक जुना हॅण्डग्रेनेड मिळून आला. कामगारांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर मेट्रोकडून चतुःश्रृंगी पोलिसांना कळविण्यात आले होते. त्यांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला ती माहिती दिली. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून जेसीबीच्या साह्याने खड्डा खणून जागेवरच ग्रेनेड निकामी केली.

ब्रिटिशकालीन हॅण्डग्रेनेट असल्याचे पोलिसांनी सांगिलते. हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तेथे कंपाऊंडचे कामदेखील सुरू आहे. त्यासाठी बाणेर परिसरात खोदकाम सुरू असताना सोमवारी (4 डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हॅण्डग्रेनेड मिळून आले. मेट्रो कामगारांनी अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित बाँम्बशोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले.
पथकातील अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हॅण्डग्रेनेड जुने असल्यामुळे ते तेथेच निकामी करणे गरजेचे होते. त्यानंतर बीडीडीएस पथकाने सुरक्षित ठिकाणी जेसीबीच्या साह्याने खड्डा खणून त्यामध्ये ग्रेनेड सुरक्षितपणे निकामी केले.

हेही वाचा

Back to top button