Pune News : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमधे 6 जण अडकले अन्… प्रशासनाची उडाली धावपळ | पुढारी

Pune News : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमधे 6 जण अडकले अन्... प्रशासनाची उडाली धावपळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बारा वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याची घटना घडली. या घटनेत पाच पुरुष आणि एक महिला असे मिळून सहाजण लिफ्ट मध्ये अडकले होते. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या सहा जणांचे सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान नागरिक लिफ्टमध्ये अडकल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. अग्निशामक दलाचे जवान, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या अथक परिश्रमानंतर सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले.

ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याची माहित अग्निशमन दलाला मिळाली. माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी पोहचताच लिफ्टमध्ये सहा जण असल्याची खाञी झाली. सुमारे तासभर अडकलेल्या लोकांना जवानांनी “घाबरू नका; आम्ही आहोत” असे म्हणत धीर दिला.

काही जवानांनी अकरा मजली असलेल्या इमारतीच्या गच्चीवर जात लिफ्ट रुममधून सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी खाली लिफ्ट अडकलेल्या ठिकाणी लोकांची भेदरलेली परिस्थिती आणि गुदमरलेलय स्थिती होते. यामुळे तातडीने फॅनची व्यवस्था करुन हवेचा स्तोञ सुरू केला. जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लिफ्टचा दरवाजा तोंडाला आणि सातव्या मजल्यावर जाऊन लिफ्ट चालू बंद करत रुग्णालयाचे सहा जणांची सुखरुप सुटका केली.

लिफ्ट बंद पडण्याचे सत्र सुरूच

या अगोदर देखील अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसापूर्वीच महापालिकेच्या लिफ्टमध्ये कर्मचारी अडकल्याने प्रशासनची धावपळ उडाली होती. तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अडकून पडले होते. तसेच त्याआधी कमला नेहरू हॉस्पिटल मधील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांची हेळसांड झाली होती. आता या घटनेमुळे पालिकेच्या लिफ्टचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.

Back to top button