El Nino : यंदाचा अल निनो ठरला सर्वात प्रबळ; 17 राज्यांत अल्प | पुढारी

El Nino : यंदाचा अल निनो ठरला सर्वात प्रबळ; 17 राज्यांत अल्प

आशिष देशमुख

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 152 वर्षांत 36 वेळा अल निनो सक्रिय होता त्यात सोळावेळा पाऊस चांगला बरसला. मात्र, अकरावेळा कमी पाऊस झाला. त्यातील पाच अल निनो वर्ष 2023मध्ये सर्वात प्रबळ ठरला असून, देशातील 17 राज्ये अल्प पावसाची ठरली आहेत. मान्सूनचा अल निनोशी नेमका संबंध कसा आहे याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम,पुणे) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केला.

त्यांनी गत 154 वर्षांतील अल निनो आणि ला निना स्थितीचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की, 1871 ते 2023 या 154 वर्षांत 36 वेळा अल निनोची स्थिती होती. मात्र, त्यात 16 वेळा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडला, तर 12 वेळा अल निनोची स्थिती असताना कमी पाऊस झाला आहे. तर आठवेळा साधारण पावसाची नोंद झाली आहे. प्रमुख पाच प्रभावी अल निनो वर्षात यंदाचा अल निनो भारतासाठी सर्वात प्रभावी ठरला.

17 राज्यात अल्प पाऊस

हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत तब्बल 17 राज्ये अल्प पावसाची ठरली. तर 2 राज्ये अत्यल्प पावसाची ठरली आहेत. केवळ 3 राज्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. 7 राज्यांत मुसळधार, तर 7 राज्यांत साधारण पावसाची नोंद झाली आहे.

ही पाच वर्षे ठरली प्रभावी

  • १९७०
  • १९७२
  • १९७५
  • १९८५
  • २०२३

अत्यल्प पावसाचे भाग (टक्के)

  • महाराष्ट्रातील मराठवाडा विभाग (-69)
  • केरळ (-60)

अल्प पावसाची राज्ये (टक्के)

पूर्व उत्तर प्रदेश (-44), बिहार (-48), झारखंड(-43), पं बंगाल (-30),ओडिशा (-22), आंध्र प्रदेश (-34),तेलंगणा (-50), महाराष्ट्र (-30 ते -51 )

अतिवृष्टीची राज्ये (टक्के)

  • पश्चिम राजस्थान (39)
  • पूर्व राजस्थान (74)
  • सौराष्ट्र( 93)

मुसळधारेची राज्ये

  • हिमाचल प्र.(20)
  • चंदीगड, दिल्ली ( 49)
  • पश्चिम उत्तर प्रदेश (30)
  • गुजरात (30)
  • मध्य प्रदेश (27)

साधारण पावसाची राज्ये

  • जम्म कश्मीर, लडाख( 8)
  • उत्तराखंड (14)
  • पश्चिम मध्य प्रदेश ( 1)
  • छत्तीसगड (11)
  • पुद्दुचेरी (6)

मान्सूनचा पाऊस एल निनोशी मजबूत संबंध दर्शवतो. परंतु सर्व प्रदेशांमध्ये भिन्न असतो. भारतभर आणि गेल्या शतकात कालमर्यादेनुसार बदल झाला आहे. उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतातील संबंध तपासले असता अल निनोचा प्रभाव उत्तर भारतात कमी जाणवला, तर मध्य भारत व दक्षिण भारतात प्रभावी ठरल्याने त्या भागात पाऊस अल्प प्रमाणात पडला. मान्सूनचा परस्पर संबंध प्रादेशिक पातळीवर आता बदलतो आहे.

-डॉ.रॉक्सी मथ्यू कोल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम

हेही वाचा

अर्थशास्‍त्र : बाईपण किती भारी?

Navratri 2023 : मंगलमय नवरात्रौत्सव आजपासून

महिला : अरबकन्यांचा प्रेरणादायी लढा

Back to top button