Pune Murder Case : पतीने आवळला पत्नीचा गळा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पुण्यातील घटना | पुढारी

Pune Murder Case : पतीने आवळला पत्नीचा गळा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पुण्यातील घटना

पुणे : पुणे शहरातील समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नुरजहा शफीक पटेल (रा. मंजुळाबाई चाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंजुळाबाई चाळ परिसरात ही घटना घडली. शफीक पटेल असे आरोपीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पटेल याला ताब्यात घेतलं.

हेही वाचा

कोरगाव भीमा : एकाच ठिकाणी आढळले दोन वेग-वेगळ्या जातीचे अतिविषारी साप

राजस्थानमधील खुनातील संशयित निजामपूर पोलिसांच्या ताब्यात

Lalit Modi : सुष्मिता सेननंतर ललित मोदी सुपर मॉडल उज्ज्वला राऊतच्या प्रेमात?

Back to top button