राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची यंदा क्रेझ! | पुढारी

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची यंदा क्रेझ!

पुणे; पुढारी वृतसेवा : राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात काही प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषकरून अभियांत्रिकी आणि एमसीएला चांगले प्रवेश झाले असून, गेल्या वर्षीपेक्षा रिक्त जागांचे प्रमाण कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांची क्रेझ असल्याचे स्पष्ट झाले आहे. अभियांत्रिकी पदवी शिक्षणाला यंदा मागणी वाढली असून, यंदा विक्रमी प्रवेश झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अधिक प्रवेश घेतले आहेत.

1 लाख 45 हजार 484 जागांपैकी 1 लाख 17 हजार 668 जागा भरल्या आहेत. सर्वाधिक प्रवेश हे पुणे विभागात 49 हजार 171 प्रवेश झाले आहेत. सर्वाधिक कमी रिक्त जागा अमरावती विभागात राहिल्या आहेत, तर एकूण 35 हजार 986 जागा रिक्त आहेत. बॅचलर इन डिझाईनसाठी 155 जागा आहेत. त्यासाठी 160 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 94 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर 67 जागा रिक्त आहेत. मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन अर्थात एमसीएसाठी 13 हजार 123 जागा आहेत.

त्यासाठी 16 हजार 7 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 11 हजार 41 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर 2 हजार 82 जागा रिक्त आहेत. बॅचरल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीसाठी 672 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी केवळ 337 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 235 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर 437 जागा रिक्त आहेत. मास्टर ऑफ आर्किटेक्चरच्या 610 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 253 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 174 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर 436 जागा रिक्त आहेत.

बीए, बीएस्सी बीएडच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी 453 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी केवळ 253 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 120 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, 333 जागा रिक्त आहेत. विधी पाच वर्षे प्रवेशासाठी 12 हजार 423 जागा आहेत. त्यासाठी 13 हजार 295 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, 8 हजार 11 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, तर 4 हजार 412 जागा रिक्त आहेत. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असल्याचे सीईटीसेलने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.’

हेही वाचा

ग्राहकांचे पैसे बुडवणार्‍या पुण्यातील बिल्डरांना दणका

अहमदनगर : छावणी परिषदप्रश्नी संरक्षणमंत्र्यांना साकडे; आमदार संग्राम जगताप यांनी दिले निवेदन

Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

Back to top button