सोमेश्वर परिसरात बिबट्याचे दर्शन | पुढारी

सोमेश्वर परिसरात बिबट्याचे दर्शन

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळ असलेल्या नीरा डाव्या कालव्याजवळ वाघळवाडी-मळशी रस्त्यावरील कालव्याच्या भरावावर बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाला आहे. सोमवारीच वाल्हेनजीक सुकलवाडी येथील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. यानंतर मंगळवारी (दि. 29) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान कालव्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिक भयभीत झाले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता राहुल जगताप व केतन जगताप हे नीरा डावा कालव्यावरून घरी जात असताना त्यांना बिबट्या निदर्शनास पडला. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण केले आहे. याबाबत वन अधिकारी पी. डी. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या संदर्भात बुधवारी सकाळी माहिती घेऊन तसेच बिबट्याचे ठसे तपासून शोध घेतला जाईल, अशी माहिती दिली.

Back to top button