पिंपरी : कांदा, बटाटा वधारला; पालेभाज्या आवाक्यात | पुढारी

पिंपरी : कांदा, बटाटा वधारला; पालेभाज्या आवाक्यात

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील भाजी मंडईमध्ये कांदा, बटाट्याचे दर वधारले असून, टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे चित्र रविवारी दिसून आले. काही दिवसांत कांद्याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दिली. तर, इतर पालेभाज्याचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. शहरातील मोशी उपबाजार, चिंचवड, आकुर्डी तसेच पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात 15 ते 20 रूपये प्रतिकिलो विक्री होत असलेल्या कांद्याच्या दरात दुप्पट वाढ होऊन 30 ते 35 रूपये, तर बटाटा 20 रूपयांवरून 30 रूपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. तसेच 200 पार केलेला मटार आता बाजारात 60 ते 70 रूपये प्रतिकिलो तर टोमॅटोचेही दर उतरले असून, 70 रूपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. कोथंबिर, मेथी, पालकचे दर 10 ते 15 रूपये प्रतिजुडी आहे.

मोशी उपबाजारातील आवक
लसूण 15, आले 34, टोमॅटो 298, हिरवी मिरची 122, कोबी 113, कांदा 455, बटाटा 761, भेंडी 98, कारली 48, शेवगा 21क्विंटलची आवक झाली आहे.

पालेभाज्यांची 46400 गड्ड्यांची आवक
घाऊक बाजारात आले 100, लसूण 100 ते 110, हिरवी मिरची 35 ते 40, कोबी 10 ते 12, टोमॅटो 40 ते 45, कांदा 15 ते 20, बटाटा 15 ते 17, भेंडी 35 ते 40, मटार 40 ते 45 रूपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 46 हजार 400 गड्डी, फळे 451 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2 हजार 860 क्विंटल एवढी आवक झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रतिजुडी)
मेथी 10
कोथिंबीर 15
कांदापात 10
शेपू 10
पुदिना 10
मुळा 10
चुका 10
पालक 15

फळभाज्यांचे किलोचे भाव
कांदा 30 ते 35
बटाटा 30
आले 140 ते 150
लसूण 150
भेंडी 60
टोमॅटो 60 ते 70
सुरती गवार 70 ते 80
गावरान गवार 100 ते 110
दोडका 60
दुधी भोपळा 60
लाल भोपळा 60 ते 70
कारली 50
वांगी 60
भरताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 100
फ्लॉवर 40
कोबी 30 ते 35
काकडी 30 ते 40
शिमला मिरची 60 ते 70
शेवगा 60 ते 70
हिरवी मिरची 50 ते 55

Back to top button