पुणे : चांडोली येथील युवकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस; पाच आरोपींना अटक | पुढारी

पुणे : चांडोली येथील युवकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस; पाच आरोपींना अटक

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : चांडोली (ता. खेड) आठ दिवसापूर्वी डोक्यात दगड घालून झाल्याच्या खूनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. बहिणीची छेड काढतो, आईला अश्लिल भाषेत बोलतो या कारणावरून हा खून झालेला होता. खेड पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल अशोक इंगुले (वय २२ रा. मोशी ता. हवेली ) याचा आठ दिवसापूर्वी चांडोली येथील रोपवाटिकेत खून झाला होता. गुन्ह्याच्या तपासात कोणताही पुरावा हाती नव्हता तसेच खून झालेल्याची ओळख पटलेली नसताना घटनास्थळी पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. परंतु खुन केलेल्या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी कोणताही पुरावा मिळुन आला नाही. त्यामुळे खुन झाल्यानंतर आरोपींचा शोध घेणे कठीण होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस पथके तयार करून गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांनी माहिती काढून धागेदोरे शोधत गुन्ह्यातील आरोपी शुभम अजय कांबळे (वय २४ ) सिराज अब्दुल सलाम, दोघे (रा. भिमनगर लक्ष्मीनगर मोशी ता हवेली ) व इतर ३ विधीसंघर्षीत बालक यांनी बहिणीची छेड काढतो व आईला अश्लिल भाषेत बोलायचा याचा राग मनात धरुन स्वप्निल अशोक इंगुले याच्या डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याची कबुली दिली. तपासात कोणताही पुरावा हाती नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस हवालदार पुनाजी जाधव, शंकर भवारी,संतोष मोरे, विजय राहतेकर, प्राविण गेंगजे, सुनिल बांडे, संतोष कंठाळे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे यांनी गुन्हा उघडकीस आणला

Back to top button