पुणे : तोडफोड करणार्‍यांची धिंड ; केशवनगर भागात माजविली होती दहशत | पुढारी

पुणे : तोडफोड करणार्‍यांची धिंड ; केशवनगर भागात माजविली होती दहशत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केशवनगर भागातील मेडिकल स्टोअरची कोयत्याने तोडफोड करीत दहशत माजविणार्‍या दोघांना मुंढवा पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यानंतर दहशत माजविलेल्या भागातूनच पोलिसांनी त्यांची धिंड काढली. सोपान रामेश्वर सावंत (वय 22, रा. फुरसुंगी), अभिषेक संजय जरांडे (वय 20, रा. केशवनगर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. रविवारी केशवनगर भागात मेडिकल स्टोअरमध्ये दोघे जण वस्तू खरेदीसाठी आले होते.

खरेदीनंतर पैसे न देता आरोपींनी कोयत्याने मेडिकल स्टोअरची तोडफोड करून दहशत माजविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सावंत आणि जरांडे यांना ताब्यात घेतले. आरोपींनी दहशत माजविलेल्या भागातच पोलिसांनी त्यांची धिंड काढली. या कारवाईबद्दल येथील नागरिक, व्यापार्‍यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त आश्विनी राख, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक समीर करपे, संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, अंमलदार दिनेश राणे, वैभव मोरे, सचिन बोराटे, दत्ता जाधव यांच्यासह पथकाने ही कारवाइ केली.

हे ही वाचा  : 

महाड-पोलादपूर शहरात पुराचे पाणी शिरण्याची शक्‍यता!; पालिकेने भोंगे वाजवून दिला सतर्कतेचा इशारा!

पाकिस्तानच्या सीमा हैदरनंतर बांगला देशच्या ज्युलीची करामत; भारतीय पतीचे केले अपहरण

Back to top button