मंचर : पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर | पुढारी

मंचर : पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव (खडकी) येथे 12 कोटी 38 लाख रुपये निधीतून होणार्‍या पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सचिन बांगर यांनी दिली. शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव (खडकी) गावासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 12.38 कोटी रुपये निधीतून जलजीवन योजनेंतर्गत अत्याधुनिक पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, हे काम प्रगतिपथावर आहे.

घोड नदीपात्रात सुरू असलेल्या जॅकवेल कामाचा तसेच वितरण व्यवस्थेसाठी करण्यात येणार्‍या जलवाहिनी कामाचा युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांसमवेत आढावा घेतला व संबंधित यंत्रणेला काही आवश्यक सूचनादेखील केल्या. या पाणी पुरवठा योजनेतून अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प, घोड नदीपात्रात स्वतंत्र विहीर, जॅकवेल, पंप हाऊस, 3 ठिकाणी एकूण 5 लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या उंच टाक्या, 32 किलोमीटर परिसरात पाण्याची जलवाहिनीद्वारे 55 लिटर प्रति मानसी 24 तास शुद्ध पाणीपुरवठा नागरिकांना केला जाणार आहे.

या वेळी शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, विभागप्रमुख विकास बांगर, युवा सेना तालुका उपप्रमुख राहुल पोखरकर पाटील, ज्येष्ठ नेते अभिलाष घेवारी, युवा नेते योगेश बांगर, युवा उद्योजक राहुल पोखरकर, भाजपचे शाखा अध्यक्ष निखिल पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

धक्कादायक ! पित्यानेच घेतला मुलाचा जीव

नारायणगाव : दीड महिन्यापूर्वी करण्यात आलेला रस्ता उखडला

Delhi Flood : दिल्लीमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट, अनेक भागात पुराचे पाणी शिरले

Back to top button