धक्कादायक ! पित्यानेच घेतला मुलाचा जीव | पुढारी

धक्कादायक ! पित्यानेच घेतला मुलाचा जीव

मिरजगाव: पुढारी वृत्तसेवा :  बापलेकाच्या भांडणात मुलाने शिवीगाळ केल्याच्या रागातून वडीलाने डोक्यात सिमेंट वीट घालून मुलाचा खून केला. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे बुधवारी ही घटना घडली. अमोल लाढाणे (वय 34) असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी खून करणार्‍या रोहिदास बापुराव लाढाणे याला अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे रोहिदास बापुराव लाढाणे हे पत्नी विमल, मुलगा अमोल व त्याची पत्नी अश्विनी हे एकत्रीत राहतात. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाप-लेक दारु पिऊन घरी आले.

घराच्या पडवीतच त्यांच्यात भांडण झाले. मृत अमोल याची पत्नी अश्विनी हिने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मुलगा अमोल हा वडीलांना अश्लिल शिवीगाळ करत होता. दोघांच्या झटापटीत मुलगा अमोल ओट्याच्या खाली पडला. राग अनावर झालेल्या बापाने जवळच असलेली सिमेंट वीट डोक्यात माल्याने अमोल खाली कोसळला. त्यानंतर परत दुसरी वीट तोंडावर मारुन पित्यानेच मुलाला जागीच ठार केले. पत्नी विमल रोहिदास लाढाणे हिच्या फिर्यादी वरून मिरजगाव पोलिस ठाण्यात पती रोहिदास लाढाणेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिता रोहीदास लाढाणे याला मिरजगाव पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : 

बदलत्या काळानुसार संतसाहित्यातही डिजिटल तंत्रज्ञानाची गरज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

बीड : पैशासाठी पत्नीचा खुन करणाऱ्या पतीस जन्मठेप

Back to top button