Pune Accident : केवळ दैव बलवत्तर म्हणून पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपघातातून वाचले | पुढारी

Pune Accident : केवळ दैव बलवत्तर म्हणून पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपघातातून वाचले

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाला पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत बुधवारी (दि. 5) किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर येथे बुधवारी केंद्रीय सचिव दौर्‍यावर येणार होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे पुणे येथून जुन्नरच्या दिशेने इनोव्हा मोटारीतून सकाळी निघाले होते. त्यांच्यासमवेत त्यांचे सुरक्षारक्षक पोलिस हवालदार संजीव पाटील व चालक दीपक दत्तात्रय शिंदे हे होते.

एकलहरे हद्दीत ट्रक क्रमांक एमपी 13 जीबी 5225 चा चालक विजय रमेश सोलंकी याने ट्रक इनोव्हाच्या बाजूला वळविला. त्यामुळे इनोव्हाचालक शिंदे यांनी मोटार डाव्या बाजूला घेतली असता ती डिव्हायडरला धडकून अपघात झाला. या अपघातात इनोव्हाचे डाव्या बाजूचे दोन्ही टायर फुटले असून, बंपरचे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने आतील तिघांना कोणातीही दुखापत झाली नाही.
मंचर पोलिसांना अपघाताची माहिती समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, आयुष प्रसाद हे दुसर्‍या वाहनातून जुन्नर येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस जी. ए. डावखर करीत आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर : माजी सैनिकासह चौघांची दीड कोटीची फसवणूक

त्यांचे नाणे खरे नाही, खणखण वाजणार नाही : शरद पवार

शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता

Back to top button