कोल्हापूर : माजी सैनिकासह चौघांची दीड कोटीची फसवणूक

कोल्हापूर : माजी सैनिकासह चौघांची दीड कोटीची फसवणूक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : सैन्यदलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकासह चौघांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाली. 25 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ई-स्टोअर सुरू करून देऊन 35 महिने दरमहा एक लाख रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली. फसवणूक करणार्‍या तीन शिक्षकांसह पाचजणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी निवेदनाद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे केली. याबाबतची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

माजी सैनिक अशोक विष्णू पाटील (रा. उंदरवाडी, ता. कागल) यांच्यासह धनाजी मारुती तांबेकर (रा. कलनाकवाडी, ता. भुदरगड), अविनाश सीताराम पाटील (रा. कासारपुतळे, ता. राधानगरी) आणि दयानंद बापूसो देवर्डेकर (रा. तुरंबे, ता. राधानगरी) यांनी हा आरोप केला. संबंधित आरोपींवर पोलिसांनी कारवाई करावी; अन्यथा आत्महत्या करावी लागेल, असा इशाराही या चौघांनी दिला आहे.
राधानगरी तालुक्यातील तीन शिक्षकांसह व अन्य दोघांनी ई-स्टोअर सुरू करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर ई-स्टोअरच्या ग्राहकांची सभासदत्व नोंदणी करून घेतली. त्यांच्याकडून प्रत्येकी नऊ हजार रुपये भरून घेतले. त्याबदल्यात ग्राहकांना 33 टक्के सवलतीत ई-स्टोअरमधील वस्तूंची खरेदी करता येणार होती. जिल्ह्यात 43 ई-स्टोअर्स सुरू करण्यात आली. फसवणूक करणार्‍या पाचजणांनी कोट्यवधी रुपये जमा केले. चार-सहा महिन्यांनंतर बहुतांंश ई-स्टोअर्स बंद झाली आहेत; तर अनेक ई-स्टोअर्स सुरूच होऊ शकली नाहीत. मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे दीड कोटीची फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news