पुणे: इंदोरीत इंद्रायणी नदीत बुडून तरुणीचा मृत्यू | पुढारी

पुणे: इंदोरीत इंद्रायणी नदीत बुडून तरुणीचा मृत्यू

इंदोरी (पुणे): मावळ येथे प्रज्ञा कौशल भोसले (वय २३ रा. वराळे ता. मावळ) या तरुणीचा इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या मुलीचा दीड महिन्यापूर्वी विवाह झाल्याची माहिती समजत आहे .ही घटना सोमवार ३ जुलैला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी इंदोरी येथील पुलाजवळील इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून मरण पावली आहे. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट झालेले नाही.

इंदोरी पोलीस स्टेशनचे प्रशांत सोरटे, अनिल पवार, सुरेश भोजने, मल्हारी धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ वन्यजीव रक्षक टीम व आपदा मित्र मावळ यांच्या टीमचे निलेश गराडे, निनाद काकडे, सुरज शिंदे, भास्कर माळी, अवि कारले, रोहित दाभाडे, गणेश गायकवाड, सुरज गोबी, विनय सावंत, शुभम काकडे यांनी प्रज्ञा भोसलेचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

हेही वाचा:

घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! हे कळायला मार्ग नाही; राज ठाकरेंची जोरदार टीका

पिंपरी : पीओपीच्या गणेशमूर्ती बनविण्यास बंदी

शरद पवार हे श्रीकृष्ण तर, अजित दादा अर्जुनाच्या रूपात; मात्र आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झालायं: प्रदीप गारटकर

 

Back to top button