पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची मान्यता | पुढारी

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची मान्यता

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी एक अपर पोलिस आयुक्त व दोन पोलिस उपआयुक्त अशा तीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वेगाने होणारे शहरीकरण, औद्योगीकीकरण, वाढत्या वाहन संख्येमुळे दुर्घटना, गुन्हेगारीतील वाढ यामुळे कामाची व्याप्ती वाढलेली असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात यापूर्वी एक अतिरिक्त आयुक्त आणि तीन पोलिस उपायुक्तांची पदे मंजूर आहेत. मात्र नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे दोन अतिरिक्त आयुक्त आणि पाच उपायुक्त होणार आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात दोन परिमंडळांमध्ये 18 पोलिस ठाणी आहेत. आता दोनऐवजी तीन परिमंडळ होणार आहेत.
तसेच, वाहतुकीच्या नियोजनाकरिता एक पोलिस उपायुक्त मिळणार आहे. अधिकाराचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे कामाला गती येईल, असा विश्वास उच्चपदस्थ अधिकार्‍यांना आहे.

हेही वाचा

पुणे : स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी दगडाला धडकली ; 70 ते 75 प्रवासी बालंबाल बचावले

पिंपरी : अश्लील ट्विट करत महिलेचा विनयभंग

जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, न्यायालयाने तिघांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Back to top button