पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महिलेच्या ट्विटर खात्यावर अश्लील ट्विट करीत तिचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार 29 जानेवारी रोजी रात्री चाकण येथे घडला. या प्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 27) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष राठोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून फिर्यादी यांच्या ट्विटर अकाउंटवर एक अश्लील ट्विट केले. ज्यामुळे फिर्यादी महिलेचा विनयभंग झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हेही वाचा