पुणे: दरीत कोसळणारी कार कठड्याला अडकली; ५ जण सुखरूप | पुढारी

पुणे: दरीत कोसळणारी कार कठड्याला अडकली; ५ जण सुखरूप

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनासाठी राज्यभर प्रसिध्द असलेल्या नगर-कल्याण महामार्गावरील निसर्गरम्य माळशेज घाटात टोकावडे पोलीस स्टेशनचे हद्दीत एक सफारी कार हजारो फूट खोल दरीत कोसळता कोसळता कठड्याला अडकली. कारमधील ५ जण सुखरूप आहेत, अशी माहिती टोकावडे पोलीस स्टेशनचे पोलीस संदीप औटी यांनी दिली.

ही कार मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला असून कार दरीच्या कठड्यावर जाऊन अत्यंत आश्चर्यकारकरित्या स्थिरावली. कारमधील पाचही जण सुखरूप असल्याचे वृत्त हाती आले आहे. कारमधील सर्वजण हे राजगुरूनगर येथील रहिवासी आहेत. आज या पाचही प्रवाशांवर ”काळ आला होता पण वेळ आली नव्हती”, तथा ”देव तारी त्याला कोण मारी”चा प्रत्यय अनुभवास आला.

हेही वाचा 

Back to top button