पिंपरी : पिस्तुल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद | पुढारी

पिंपरी : पिस्तुल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुन्हेगार सोन्या काळभोर याच्या टोळीतील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. बाळासाहेब अंगदराव सातपुते (26, रा. आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कुख्यात गुन्हेगार सोन्या काळभोर याच्या टोळीची आकुर्डी व निगडी या भागात दहशत आहे. आरोपी सातपुते हा परिसरातील नागरिकांना धमकावत होता. स्थानिकांना दमदाटी करीत असल्याची कुणकुण पोलिसांच्या कानावर होती. मात्र, दहशतीमुळे ठाण्यात लेखी तक्रार देण्यास देखील पुढे येत नव्हते.

दरम्यान, आरोपी स्वतःजवळ पिस्तूल बाळगत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दरोडाविरोधी पथक मागावर असताना आरोपी भक्ती शक्ती चौक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 35 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त केले. आरोपीवर निगडी पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस कर्मचारी उमेश पुलगम, आशिष बनकर, प्रवीण कांबळे, गणेश हिंगे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हे ही वाचा : 

पैठणची शाळा घडवतेय टाळकरी अन् कीर्तनकार !

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

Back to top button