पैठणची शाळा घडवतेय टाळकरी अन् कीर्तनकार ! | पुढारी

पैठणची शाळा घडवतेय टाळकरी अन् कीर्तनकार !

पैठण; चंद्रकांत अंबिलवादे : वारकरी, टाळकरी, मृदुंगाचार्य, कीर्तनकार हा पंढरीच्या वारीचा अविभाज्य भाग. त्यात पारंगत होण्यासाठी केवळ सांस्कृतिक वारसा पुरेसा नाही, शास्त्रशुद्ध शिक्षणही घ्यावेच लागते. हे शिक्षण देत हजारो कीर्तनकार, टाळकरी, मृदुंगाचार्य दक्षिणकाशी पैठणमध्ये घडविले जात आहेत. ह.भ.प. रखमाजी रामभाऊ महाराज नवले यांचे घराणे गेल्या तीन पिढ्यांपासून हे शिक्षण देत आले आहेत.

रविवारी (दि. १०) महाराष्ट्राच्या शेकडो वर्षांच्या परंपरेचे दर्शन घडविणारी पंढरीची वारी सुरू होत आहे. ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज या संतश्रेष्ठांसह सर्व संतांच्या पालख्या प्रस्थान ठेवत आहेत. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही प्रस्थान करणार आहे. या वारीत नवले महाराजांनी घडविलेले हजारो शिष्य सहभागी होत आहेत. त्यांनी चालविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत सोलापूर, कोल्हापूर, आळंदी, पंढरपूर अरण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव अहमदनगर, नाशिक या परिसरातील वारकरी विद्यार्थी घडले आहेत. १९६२ साली सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी ये गेले व संस्थेचा संपूर्ण अभ्यास पूर्ण करून पुन्हा गावाकडे परतले. नंतर श्री रखमाजी महाराज पैठणचे महिना वारकरी होते. त्यांनी गावोगाव जाऊन विद्यार्थी तयार केले. त्याचवेळ त्यांच्या मनात संकल्पना आली की, आपणही शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी वारकरी संस्था काढावी.. त्यानुसार त्यांनी नालेवाडी गावात संस्थेची स्थापना १९८१ साल केली. पुढे ही संस्था श्रीक्षेत्र आपेगावात आली आणि तेथून नवले महाराजांनी तिचे स्थलांतर शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या चरणी १९८९ मध्ये केले.

या वारकरी शिक्षण‍ संस्थेत बाल विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. या विद्यार्थ्यांन दररोज वारकरी संप्रदायातील वस्तुनिष्ठ माहिती देऊन दिवसभरात तीन वेळा टाळ, मृदंग, प्रवचन, कीर्तन यास वारकरी संप्रदायातील नित्य कार्यक्रमांचे प्रशिक्षण देऊन तया केले जाते. मानाचे स्थान लाभलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील प्रमुख टाळकरी म्हणून गेल्य अनेक वर्षापासून या संस्थेतील विद्यार्थी मानकरी ठरत आले आहेत. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वारकरी शिक्षण संस्थेला इतर शैक्षणिक संस्थांप्रमाणे अनुदानाची तरतूद झाली, तर गरीब, कष्टकरी, शेतकर यांच्या मुलांना संजीवनी ठरेल, जाईल अशी अपेक्षा संस्थेच प्रमुख ह.भ.प. रखमाजी महाराज नवले यांनी व्यक्त केली

अनुदान नाही

विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी कृष्णा महाराज नवले, विश्वंभर महाराज नवले, ऋषी महाराज नवले हे शिक्षक मोठ्या उत्साहाने पार पाडतात. वारकरी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त मठाची स्वखर्चाने निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेला शासनाचे अनुदान नाही. सध्या एक हजाराहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. ते दररोज हरिपाठाने दिनचर्या सुरू करतात आणि अवघे वातावरण भक्तिमय करून टाकतात. राज्यातील विविध देवस्थानांच्या निमंत्रणावरून येथील शिस्तप्रिय विद्यार्थी टाळकरी, मृदंगाचार्य म्हणून हजेरी लावतात.

Back to top button