पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी राज्यातील सुविधा केंद्रे निश्चित | पुढारी

पदविका प्रवेशप्रक्रियेसाठी राज्यातील सुविधा केंद्रे निश्चित

पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयाकडून शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील बारावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील सुविधा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच त्यांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांच्या पडताळणीसह अन्य कार्यासाठी संबंधित सुविधा केंद्रांचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्यातील शासकीय, अशासकीय अनुदानित, विद्यापीठ संचालित व खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नोलॉजी, सरफेस केटरिंग टेक्नोलॉजी या पदविका अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. प्रणाली व्यवस्थापक उमेश कोकाटे हे सुविधा केंद्रांसाठी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले.

येथे करावा संपर्क…

सुविधा केंद्रप्रमुखांनी अधिक माहितीसाठी 022-68597459/ 68597465/ 68597469/ 68597466/ 68597492/ 68597468 या दूरध्वनीवर संपर्क साधावा. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार सर्व सुविधा केंद्रे सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू राहतील.

हेही वाचा

वीज पोल शिफ्टिंगचा प्रस्ताव सादर करा

राज्यातील शाळांपुढे नवा पेच ! स्काऊट-गाईड गणवेश आणायचा कुठून?

नगर : वादळाने मोहरी परिसरात दाणादाण

Back to top button