पुणे: वासुली फाटा येथे १० किलो गांजा जप्त, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कामगिरी | पुढारी

पुणे: वासुली फाटा येथे १० किलो गांजा जप्त, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

महाळुंगे इंगळे (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा १० किलो १०४ ग्रॅम गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली. वासुली फाटा (ता. खेड) येथील रुद्रा हॉटेलसमोर भामचंद्र रस्त्यावर मंगळवारी (दि. ६) सकाळी सव्वापाच वाजता ही कारवाई करण्यात आली. रवींद्र काशीराम राठोड (वय ३८, रा. मोरे कॉम्प्लेक्स, कडूस, ता. खेड) असे गांजा विक्री करताना ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिस जवान शरद शांताराम खैरे (वय ३८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र राठोड हा गांजा विक्रीसाठी वासुली फाटा (ता. खेड) येथील रुद्रा हॉटेलसमोर आल्याची माहिती माहिती महाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राठोडला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे तब्बल २ लाख ८२ हजार ६०० रुपयांचा १० किलो १०४ ग्रॅम गांजा आढळून आला. गांजासह त्याच्याकडील दुचाकी पोलिसांनी जप्त केली. राठोड हा विकास बधाले (रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ) याच्याकडून गांजा घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ, पुणे न्यायालयाकडून समन्स

पुणे: दररोज एक कोटी लिटर पाण्याची बचत, मीटरमुळे पाणीगळती शोधण्यात यश

पुणे: प्रियकराच्या साथीने वडिलांचा खून, आईसह तिघांविरुद्ध गुन्हा; पाच दिवसांत गुन्ह्याचा छडा

 

Back to top button