पुणे क्राईम : पीएमपी चालकाचा रस्त्यात गाठून निर्घृण खून | पुढारी

पुणे क्राईम : पीएमपी चालकाचा रस्त्यात गाठून निर्घृण खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी चालकाला रस्त्यात गाठून त्याचा निर्घृण खून करून करण्यात आला. इतकेच नाही तर चेहरा विद्रुप करून मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळातच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गौतम मच्छिंद्र साळुंखे (29, रा. पापडेवस्ती, ढमाळवाडी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरूण चालकाचे नाव आहे.

अधिक वाचा

पद्म पुरस्कारासाठी नामांकने देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

निलेश राणे : ‘शरद पवारांनी नाना पटोलेंना पान टपरी वालाचं करून टाकला’

गौतम गेल्या अडीच वर्षापासून पीएमपीमध्ये चालक म्हणून नोकरीस आहे. शनिवारी त्यांनी दुपारपाळी असल्याने ते दुपारीच कामासाठी आपली दुचाकी घेऊन बाहेर पडले होते.

स्वारगेट ते धायरी या पीएमपी बसवर त्यांनी दिवसभर काम केल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास स्वारगेट डेपोत बस लाऊन तो घरी जाण्यासाठी बाहेर पडला.

अधिक वाचा

Twitter ने अखेर तक्रार अधिकारी नेमला; नव्या आयटी मंत्र्यांच्या इशाऱ्याने तीन दिवसात उपरती!

समान नागरी कायदा हा केंद्राचा विषय, शरद पवार यांचे भाष्य

परंतु, रविवारची सकाळ उजाडल्यानंतरही तो घरी न परतल्याने त्यांचे सासर्‍यांनी स्वारगेट डेपोत जाऊन गौतम बाबत चौकशी केली.

तेथे त्यांना रात्रीच गौतम ड्युटी संपून गाडी डेपोत लावून घरी गेल्याचे समजले.

गौतम दिवसभर घरीच न आल्याने त्यांनी इतर विचारपूस केली. शेवटी त्यांना गौतमचा मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकून दिल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गौतमचे सात वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याला सव्वा वर्षाची मुलगी आहे.

तो आपल्या सासर्‍यांकडेच रहायला होता. दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून खुनाचे कारण समजू शकले नाही.

हे ही वाचलं का?

एमी जॅक्सन जेव्हा ऐश्वर्या राॅयचा ‘ताे’ फोटो शेअर करते

एमी जॅक्सन जेव्हा ऐश्वर्या राॅयचा ‘ताे’ फोटो शेअर करते

Back to top button