पुणे : डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : कुरुलकरला आज न्यायालयात हजर करणार | पुढारी

पुणे : डीआरडीओ हनीट्रॅप प्रकरण : कुरुलकरला आज न्यायालयात हजर करणार

पुणे; पुढारी विशेष : पाकिस्तानशी लागेबांधे असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला पुणे डीआरडीओचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोरेश्वर कुरुलकर याची न्यायालयीन कोठडी आज (दि. 30) संपत आहे. कडेकोट बंदोबस्तात त्याला एटीएस पथक न्यायालयात हजर करणार आहे. येरवडा कारागृहातही त्याची चौकशी करण्यात आली असून, तपास यंत्रणेच्या हाती नवी माहिती लागली असल्याचे समजते.

पुणे येथील संशोधन करणार्‍या संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (DRDO) दिघी येथे शास्त्रज्ञ पदावर असलेला कुरुलकर पाकिस्तानी ललनांच्या हनीट्रॅपमध्ये (honey trap) अडकला व त्याने संरक्षण दलाची गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राच्या हाती दिली होती. या प्रकरणी एटीएसने 3 मे रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने त्याला दोन वेळेस मिळून 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. अखेर न्यायालयाने 15 मे रोजी त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली होती.

Back to top button