राज्यातील पॉझिटिव्हिटी दर अडीच टक्क्यांपर्यंत घटला | पुढारी

राज्यातील पॉझिटिव्हिटी दर अडीच टक्क्यांपर्यंत घटला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संभाव्य लाटेची टांगती तलवार तूर्तास दूर झाल्याने आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. पॉझिटिव्हिटी दरही अडीच टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवस इतका कमी झाला होता. एकीकडे ‘एच3एन2’, तर दुसरीकडे कोरोना विषाणूच्या ‘एक्सबीबी 1.16’ या उपप्रकाराने चिंतेत भर घातली. दररोजच्या रुग्णसंख्येने हजारचा टप्पा ओलांडला.

राज्यात आतापर्यंत एक्सबीबी 1.16 व्हेरियंटचे 1241 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 1628 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी 94 टक्के गृहविलगीकरणात, तर 6 टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 1 टक्का रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी 7295 चाचण्या झाल्या, त्यापैकी 177 रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले.

राज्यातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर

दिवस चाचण्या कोरोनाबाधित पॉझिटिव्हिटी दर
7 मे 7295 177 2.42
6 मे 5491 176 3.02
5 मे 11155 299 2.68
4 मे 10287 361 3.50
3 मे 11083 299 2.69
2 मे 3361 139 4.13
1 मे 4456 177 3.97

Back to top button